Solkadhi Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Solkadhi Recipe : अपचन, मधुमेहावर फायदेशीर आहे सोलकढी, पाहा रेसिपी

How To Make Solkadhi : कोकण आणि मालवणातील सगळ्यात प्रसिद्ध असा पदार्थ म्हणजे सोलकढी.

कोमल दामुद्रे

Konkani Special Solkadhi : कोकण आणि मालवणातील सगळ्यात प्रसिद्ध असा पदार्थ म्हणजे सोलकढी. भारतात असे अनेक पदार्थ आहेत जे फक्त पाहण्यासाठी नाही तर त्याची चवही तितकीच मजेशीर आहे.

नॉन व्हेजसोबत सोलकढीची चव ही अगदी निराळी. नारळाचे दूध (Milk) व कोकमचे सार याच्या मिश्रणातून तयार झालेली सोलकढी. सोलकढी हा असे एक पेय आहे ज्यामध्ये तिखट, गोड, आंबट व खारट व तुरट अशी चव समप्रमाणात असते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का अपचनाच्या व मधुमेहाच्या (Diabetes) समस्येवर सोलकढी फायदेशीर आहे.

सोलकढीमध्ये कोकम व खोबऱ्याचा वापर केला जातो. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर्स, मॅग्नेशियम, जीवनसत्त्व (Vitamins) क व पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहाते. तसेच कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहातो. अपचनावर देखील फायदेशीर आहे. जाणून घेऊया ही सोलकढी बनवण्याची योग्य पद्धत.

1. साहित्य

  • १/२ कप - पाणी

  • 12 कोकम (मलबार चिंच)

  • १ कप- नारळ (किसलेले)

  • १- हिरवी मिरची

  • २- लसूण पाकळ्या

  • 2 चमचे - कोथिंबीर पाने

  • १/२ टीस्पून - जिरे पावडर चवीनुसार - मीठ

  • पुदीना

2. कृती

  • सर्वप्रथम कोकमला गरम पाण्यात 30 ते 45 मिनिटे भिजवा. त्याचा रस काढा.

  • रस काढल्यानंतर तो चांगला निथळून घ्या. नंतर अर्कासोबत गरम पाण्यात टाका

  • आता एका भांड्यात हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण, हिरवे धणे आणि मीठ एकत्र ठेवा.

  • किसलेले खोबरे आणि पाणी ग्राइंडरमध्ये घालून गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या.

  • मिश्रणातून नारळाचे दूध काढण्यासाठी बारीक चाळणीतून पेस्ट गाळून घ्या .

  • तुम्ही ही प्रक्रिया पुन्हा करू शकता, पण लक्षात ठेवा की दूध पातळ होऊ नये.

  • दुसऱ्या भांड्यात स्किम्ड दूध, कोकम मिश्रण आणि लसूण-मिरचीची पेस्ट घालून मिक्स करा.

  • त्यानंतर त्यात आवश्यक प्रमाणात मसाले घाला. त्यानंतर वरुन पुदिन्याची पाने व चिरलेले कोथिंबीर घालून थंडगार सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT