Gudi Padwa Shrikhand-Puri Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Gudi Padwa Recipe: गुढी पाडव्याला नैवेद्यात श्रीखंड पुरीचं का ? जाणून घ्या महत्त्व व रेसिपी

Shrikhand-Puri Recipe : जसे मकर संक्रांतीला तीळाचे महत्त्व असते, होळीला पुरणपोळीचे तसेच गुढीपाडव्याला हमखास घरोघरी खाल्ले जाते ते श्रीखंड पुरी...

कोमल दामुद्रे

Shrikhand Puri Recipe : गुढीपाडवा म्हटलं तर आनंदाचा, नव वर्षाचा व उत्साहाचा दिवस. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

हिंदू दिनदिर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा (Celebrate) केला जातो. यंदा हा पाडवा 22 मार्च, बुधवारी साजरा केला जाणार आहे.

हिंदू धर्मात हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन घर, वस्तू किंवा सोन्याची खरेदी केली जाते पण शास्त्रानुसार गुढी उभारल्यानंतर तिला गोडाधोडाचा नैवेद्य देखील दाखवला जातो.

या दिवशी घरोघरी (Home) बांबू, रेशमी वस्त्र, तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या नैसर्गिक आणि आरोग्यास (Health) पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली जाते. बत्ताश प्रसाद म्हणून वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी आवर्जून खाल्ली जाते.

जसे मकर संक्रांतीला तीळाचे महत्त्व असते, होळीला पुरणपोळीचे तसेच गुढीपाडव्याला हमखास घरोघरी खाल्ले जाते ते श्रीखंड पुरी... असे म्हटलं जाते की, नवीन वर्षाची सुरुवात ही गोड क्षणांनी करावी त्यासाठी आपल्या ताटात आवर्जून असतात ते गोडाचे पदार्थ.

गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो. पण यामागचे कारण अनेकांना माहित नाही जाणून घेऊया त्याबद्दल

आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.

1. आता गुढी पाडव्याला श्रीखंडच का खायचे?

कडक रखरखत्या उन्हाचा सामना करता यावा, शरीरातील थकवा दूर व्हावा व शरीरशक्‍ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे बहुगुणी ठरते. श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात यामुळे श्रीखंड बाधते. जाणून घेऊया रेसिपी

2. साहित्य-

  • 1.5 कप दही

  • ¼ टीस्पून वेलची पावडर

  • 2 ते 3 चिमूटभर किसलेले जायफळ

  • ½ कप साखर (Sugar)

  • 1 टीस्पून गरम दूध (Milk)

  • केशर काड्या 12 ते 15 धागे किंवा 1 चिमूटभर

  • 2 चमचे काजू, बदाम व पिस्ता

3. कृती

  • दही स्वच्छ कापडात घ्या. त्याला २ तास लटकवून ठेवा म्हणजे दह्यात असलेलं पाणी निघून जाईल.

  • नंतर घट्ट बनलेल दही एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये साखर आणि वेलची मिक्सरमधून बारीक करून टाका.

  • दह्याला व्यवस्थित फेटून घ्या त्यानंतर त्यात आता बदाम, पिस्ता तुकडे टाका.

  • एका दुसऱ्या भांड्यात दूध आणि केशर मिसळा. त्याला एकसंध रंग आला की त्यामध्ये मुलायम दही मिश्रण मिक्स करा.

  • सर्व मिश्रण एकजीव करून फ्रिजमध्ये ठेवून द्या. थंड झाल्यानंतर खायला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

SCROLL FOR NEXT