Sabudana Papad Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Sabudana Papad Recipe: उन्हाळ्यात बनवा साबुदाणा पापड, कुरकुरीत आणि टेस्टी बनतील; पाहा रेसिपी

Unhali Valvan Recipe In Marathi: उन्हाळा सुरु झाला की, सर्वांकडे सुकवणीचा हंगाम सुरु होतो. या हंगामात आपण पापड, कुरड्या, सांडगे, शेवया, कोकम आणि कैऱ्या अशा बऱ्याच प्रकारच्या सुकवणी करतो.

कोमल दामुद्रे

How To Make Sabudana Papad :

उन्हाळा (Summer Season) सुरु झाला की, सर्वांकडे सुकवणीचा हंगाम सुरु होतो. या हंगामात आपण पापड, कुरड्या, सांडगे, शेवया, कोकम आणि कैऱ्या अशा बऱ्याच प्रकारच्या सुकवणी करतो.

पापड वर्षभर टिकावेत म्हणून महिलावर्ग अनेक प्रयत्न करतात. काही उडदाच्या डाळीचे तर काही बटाट्याचे पापड बनवतात. परंतु, बरेचदा साबुदाण्याचे पापड बनवताना ते फसतात. त्यासाठी सहसा आपण बाजारातून विकत आणतो. जर तुम्हालाही घरीच पापड बनवायचे असतील तर साबुदाणा पापड बनवू शकता पाहूया रेसिपी (Recipes).

1. साबुदाणा पापड कसा बनवायचा?

  • साबुदाणा पापड बनवण्यासाठी साबुदाणा नीट धुवून थोडावेळ भिजत घाला.

  • चवीनुसार मीठ घालून भिजवू द्या. हा साबुदाणा रात्रभर भिजत घाला.

  • साबुदाणा किमान ७ ते ८ तास भिजवावा लागेल. त्यानंतर तो अधिक मऊ होईल.

2. कृती

  • मोठ्या जड तळाच्या भांड्यात तीन कप पाणी घालून उकळवण्यास ठेवा.

  • पाणी उकळल्यानंतर त्यात साबुदाणा, मीठ आणि जिरे घालून चमच्याने ढवळत राहा.

  • ज्यामुळे साबुदाणा तळाला चिकटणार नाही. साबुदाणा पापड बनवण्यासाठी तयार आहे.

3. या टीप्स फॉलो करा

  • पापड बनवण्यासाठी इडली स्टँडला तेलाने ग्रीस करा.

  • नंतर साबुदाणा घालून १५ ते २० मिनिटे वाफेवर शिजवा.

  • आता उन्हात हे पापड वाळवत घाला. किमान २ ते ३ दिवस हे पापड चांगले वाळवून घ्या.

  • पापड नीट वाळल्यानंतर वर्षभर टिकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT