Making Cake in Cooker Saam Tv
लाईफस्टाईल

Making Cake in Cooker : बिना ओव्हनचा घरच्या घरी केक बनवताय? या सोप्या टिप्स फॉलो करा, बनेल एकदम सॉफ्ट

How To Make Perfect Cake in Pressure Cooker : कधी कधी आपण केक बेकरीसारखा सॉफ्ट बनवण्याचा प्रयत्न करतो परंतु, बहुतेकदा तो आपल्या हवा तसा बनत नाही.

कोमल दामुद्रे

Cooking Hacks :

हल्ली केक हा स्पेशल दिवस, बर्थडे किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी आवर्जून खाल्ला जातो. कधी कधी आपण हा केक बेकरीसारखा सॉफ्ट बनवण्याचा प्रयत्न करतो परंतु, बहुतेकदा तो आपल्या हवा तसा बनत नाही.

जर तुम्ही देखील घरच्या घरी ओव्हन न वापरता केक बनवण्याचा ट्राय करत असाल तेही कुकरमध्ये तर या सोप्या टिप्स फॉलो करा. ज्यामुळे तुमचा केक बेकरीसारखा बनेल.

1. योग्य कुकर वापरा

केक बनवण्यासाठी नेहमी जाड तळ आणि घट्ट झाकण असलेला कुकर वापरा. तसेच झाकणाचे रबर काढून झाकण लावावे. याशिवाय केक बनवण्यापूर्वी कुकर ५ मिनिटे व्यवस्थित गरम करा.

2. स्टँड वापरा:

केक (Cake) पिठात ठेवले जाणारे भांडे थेट कुकरमध्ये कधीही ठेवू नका. यामुळे केक खराब होऊ शकतो आणि तो जळू शकतो. म्हणून, नेहमी कुकरमध्ये प्रथम स्टीलचे स्टँड ठेवा आणि नंतर त्यावर पिठ असलेले भांडे ठेवा. असे केल्याने केक चांगला बेक होतो.

3. केकच्या पिठात व्हिनेगर मिसळा.

जर तुम्हाला बेकरी प्रमाणे मऊ आणि स्पॉन्जी केक घरी (Home) बनवायचा असेल तर पिठात अर्ध्या चमचे व्हिनेगर पेक्षा थोडे कमी घाला.

4. या तापमानात केक शिजवा:

जर तुम्ही कुकरमध्ये केक बनवत असाल, तर मंदआचेवर ठेवा. ओव्हनपेक्षा गॅसवर केक बनवायला जास्त वेळ (Time) लागतो, त्यामुळे अजिबात घाई करू नका. टूथपिकने एक किंवा दोनदा तपासून तुम्ही केकच्या शिजला की नाही याचा अंदाज लावू शकता. पण सतत केक शिजला की नाही पाहू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT