Gauri Pujan 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Gauri Pujan 2022 : गौरीपूजनाच्या दिवशी अशाप्रकारे ठेवा पानाचा विडा

गौरीला नैवेद्यात ठेवा या पानांचा विडा

कोमल दामुद्रे

Gauri Pujan 2022 : विघ्नहर्त्या गणेशापाठोपाठ समृद्धी घेऊन घरी महालक्ष्मीचे आगमन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठीला किंवा सप्तमीला होते. या माहेरवाशीणी माहेरी आल्या की जेवण करुन तृप्त होऊन पुन्हा आपल्या सासरी जाव्यात अशी धारणा असते.

पुरणा-वरणाचे जेवण झाल्यावर हे खाल्लेले सगळे नीट पचावे यासाठी आपण विडा खातो. एरवी हा विडा आपण साध्या पद्धतीने बनवत असलो तरी गौरीसाठी किंवा नैवेद्याचे ताट ठेवताना त्यासोबत आपण गोविंद विडा ठेवतो.

१. गोविंद विडा म्हणजे ५ पानांचा मिळून केलेला विडा. लहान मोठ्या आकाराची पानं घेऊन ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावीत.

२. या पानांची देठ काढून त्यातील मध्यम आकाराच्या एका पानाला मागून अगदी हलका चुना लावून घ्यायचा. खूप जास्त चुना लावला तर पान तिखट लागते. तसेच सगळ्या पानांना चुना न लावता एकाच पानाला चुना लावला तरी चालतो.

३. या चुना लावलेल्या पानावर अर्धा चमचा गुलकंद आणि सुके खोबरे (Coconut) घाला. त्यावर कातलेली सुपारी किंवा तुम्हाला आवडेल ती सुपारी घातली तरी चालते. नंतर यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरची एकत्र असलेली रंगीबेरंगी बडीशेप घाला. आपण आपल्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार धणाडाळ, साधी बडीशेप असे काहीही घालू शकता.

४. यामध्ये चमन बहार घाला, त्यामुळे पानाला छान स्वाद येईल. यावर अगदी थोडा कात घातला तरी चालतो. यामुळे विडा रंगायला मदत होते. यानंतर वेलदोड्याचे २-३ दाणे देखील घालू शकतो.

५. पानामध्ये सगळे घालून तयार झाले की त्याचे फोल्डींग सगळ्यात महत्त्वाचे आहे. पान आडवे ठेवून त्याचा परफेक्ट त्रिकोण होईल अशा पध्दतीने फोल्ड करा. पान कोनासारखे हातात घ्यायचे आणि पानावर ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आतमध्ये दाबून घ्यायच्या. यामध्ये आपल्याला आणखी काही घालायचे राहिले असल्यास घालू शकता. यावर २ काड्य़ा केशर (Saffron) घालावे. वरच्या बाजुने ३ पोल्ड देऊन हा विडा बंद करावा.

६. या विडाचे टोक वरच्या बाजूला घेऊन एका पानावर ठेवायचे. पाने दोन्ही बाजूने दोन दोन घड्या घालून दुमडून मग खालच्या बाजूला दुमडायचे. उरलेल्या तिन्ही पानांचे असेच करुन घ्यायचे. याला खालच्या बाजुने लवंग लावून विडा बंद करायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satbara : सातबारा आता फक्त १५ रूपयात, तलाठ्याच्या सहीची गरज नाही

Rohit Sharma: भर मैदानात रोहित शर्माने कोणती मागितली इच्छा? हिटमॅनचा जवळचा मित्र अभिषेक नायरने केला खुलासा

LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT