How to make kairiche panh
How to make kairiche panh ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Recipe : तोंडाला पाणी सुटणाऱ्या कैरीचे पन्ह

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळा म्हटलं की, सर्वत्र आपल्याला आंबे (Mango) आणि कच्ची कैरी यांचा मोसम दिसू लागतो. लहानपणी शाळेच्या अवतीभोवती चिंचवाल्याकडे ही कैरी अगदी तिखट-मीठ लावून आपल्याला खायला मिळायची. कधीतरी शाळेलगत (School) असणाऱ्या झाडांवर तीच अस्तित्व पाहायला मिळायचं. कच्च्या कैरीला तिखट-मीठ लावून कुणाला खायला आवडणार नाही. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आणि आपले जेवण अधिक रुचकर बनवण्यासाठी आपण कच्च्या कैरीचा भरपूर प्रमाणात वापर करतो. कैरीपासून लोणची, पन्ह, चटणी खाल्ली जाते. कडाक्याच्या उन्हात कैरी खाल्ल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच पण आंब्याचा रस उष्माघात टाळण्यासही मदत करतो. लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनाच कैरीची चव आवडते.

हे देखील पहा -

कैरीचे पन्ह बनवण्याची पद्धत सोपी असली तरी कमी वेळात तयार होते. बाजारात अनेक प्रकारचे पन्ह मिळतात पण घरगुती पन्ह कसे बनवायचे ते पाहूया

पन्ह बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

आवश्यकतेनुसार कच्ची कैरी

भाजलेले जिरे पूड

गूळ/साखर

काळे मीठ

चाट मसाला

पुदिन्याची पाने

मीठ चवीनुसार

वरील सर्व साहित्य आवश्यकतेनुसार व चवीनुसार घ्यावे

कृती -

कैरीचे पन्ह बनवण्यासाठी प्रथम कैरी नीट धुवून घ्या. यानंतर प्रेशर कुकरमध्ये कैरी टाकून उकळायला ठेवा. ४ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवा. कैरी थंड झाल्यावर तिला पिळून घ्या. कैरीचा पल्प हाताच्या साहाय्याने चांगला मॅश करा आणि त्यात बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, किसलेला गूळ किंवा साखर, जिरेपूड, काळी मिरी, काळे मीठ, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व चांगले मिसळा. हे तयार मिश्रण मिक्सरमध्ये घेऊन आणि गरजेनुसार पाणी (Water) घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. अशा प्रकारे आंबट-गोड पन्ह तयार होईल. बर्फाच्या तुकडे घालून सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

SCROLL FOR NEXT