Masala Papad Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Masala Papad Recipe : चटपटीत गावरान मसाला पापड, ५ मिनिटांत बनेल; रेसिपी पाहा

Gavran Style Masala Papad : हॉटेलमध्ये गेला अन् मसाला पापडची चव चाखली नसेल तर मज्जा काय! हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर फूड लिस्टमधील सगळ्यात जास्त पसंती असते ती मसाला पापडला. जेवणाच्या सुरुवातीला स्टार्टर म्हणून अनेकजण आवडीने हे मागवतात.

कोमल दामुद्रे

How To Make Masala Papad :

हॉटेलमध्ये गेला अन् मसाला पापडची चव चाखली नसेल तर मज्जा काय! हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर फूड लिस्टमधील सगळ्यात जास्त पसंती असते ती मसाला पापडला. जेवणाच्या सुरुवातीला स्टार्टर म्हणून अनेकजण आवडीने हे मागवतात.

आपल्या घरात पापड असतो किंवा डब्यात विविध पापडचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काहींना उडदाच्या डाळीचे तर काहींना बटाट्याचे पापड आवडतात. मसाला पापड बनवताना उडदाच्या डाळीचा पापडाचा वापर करावा.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मसाला पापड आवडीने खातात. जर तुम्हालाही हॉटेलसारखा पण चटपटीत गावरान मसाला पापडची चव चाखायची असेल तर ५ मिनिटांत बनवू शकता. पापड नरम पडू नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य मसाला पापड I Ingredients : -

  • पापड I Papad

  • बारीक चिरलेला कांदा (Onion) - १ मोठा I Finely chopped Onion – 1 big

  • बारीक चिरलेला टोमॅटो - १ मोठा I Finely chopped Tomato – 1 big

  • मिरची पावडर - I Red Chilli powder – as per requirement

  • बारीक चिरलेली कोथिंबीर I Finely chopped Coriander

  • बारीक शेव I Barik Shev

  • चाट मसाला I Chat Masala

  • काळे मीठ I Black Salt

कृती

  • सर्वात आधी कढईत तेल (Oil) गरम करुन पापड तळून घ्या. त्यानंतर तळलेला पापड प्लेटमध्ये ठेवा.

  • त्यावर कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट वरुन कोथिंबीर आणि शेव घाला.

  • मसाला पापड अजून टेस्टी बनवायचे असेल तर लाल मसाल्यात तेल घालून पापडावर पसरवून घ्या.

  • त्यावर वरुन कांदा, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि शेव घाला. तयार आहे गावरान झणझणीत टेस्टी मसाला पापड.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT