Fashion tips in Marathi
Fashion tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Fashion Tips : सैल ब्लाउजला अधिक स्टायलिश कसे कराल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साडी, लेहेंगा किंवा श्रग सोबत आपण ब्लाउज सहज परिधान करु शकतो. साडीवर अधिक भर घालण्यासाठी आपण ब्लाउजला स्टायलिश करत असतो. बहुतांश महिला साडीसोबत (Saree) ब्लाउज घालणे पसंत करतात. कारण ब्लाउज तुमच्या लुकमध्ये चार्म आणण्याचे काम करतात. (Fashion tips in Marathi)

हे देखील पहा -

आपल्यापैकी बऱ्याच महिलांचा वॉर्डरोब हा ढिगभर साड्यांनी व ब्लाउजने भरलेला असतो. साडी घालण्याची इच्छा असून देखील ब्लाउजच्या फिंटिंगमुळे आपल्याला ती नेसता येत नाही. अशा सैल ब्लाउजला स्टायलिश लुक देऊन आपण साडी कशी नेसू शकतो हे जाणून घ्या.

१. आपल्या वॉर्डरोब ब्लाउजने भरलेला असतो परंतु, त्यात असे अनेक ब्लाउज असतात ज्यांच्या फिटिंगमुळे त्यांचा लूक किंवा डिझाइन खराब होते आणि आपल्यापैकी बऱ्याच जणींना सैल ब्लाउज घालणे आवडत नाही. ब्लाउज सैल होत असेल तर त्याला मागच्या बाजूने दोरी लावू शकता. आपण ब्लाउजमध्ये स्ट्रिंगसह टॅसल देखील वापरू शकता.

२. आपले ब्लाउज ओव्हर साइजचे असेल तर त्यावर आपण कोट घालू शकतो. त्यामुळे आपला लूज ब्लाउजही लपला जाईल. परंतु, कोटची निवडही आपल्या ब्लाउजनुसार करावी लागेल. आपला ब्लाउज प्रिंट केलेला असेल तर त्यासाठी आपण साधी कोट निवडू शकतो. त्याचवेळी आपल्याकडे साध्या ब्लाउजसह प्रिंटेड श्रग घालण्याचाही पर्याय आहे. आपण ब्लाउजसोबत लेहेंगा किंवा साडी सहज घालू शकता परंतु, आपल्याला कोटच्या लांबीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल.

३. लांब श्रग हे साड्यांबरोबर अधिक छान दिसतात. याशिवाय आपण ब्लाउजवर कोटला वेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकतो. आपण जास्त आकाराच्या ब्लाउजवर रंगीबेरंगी कोट देखील घालू शकतो. आपल्या जास्त आकाराचे ब्लाउज फिटिंग करण्याचीही गरज भासणार नाही.

४. आपला ब्लाउज खूप सैल असेल तर आपण तो ऑफ शोल्डर लूक करून देखील घालू शकतो. यासाठी आपल्याला ब्लाउज दोन्ही खांद्यांपासून खाली करावी लागेल, ज्यामुळे आपण साडी किंवा लेहेंग्यासह सहजपणे स्टाईल करू शकता. आपण लेहेंग्यासह ब्लाउज घातला असेल, तर ब्लाउजला कफ्तानप्रमाणे स्टाईल करणे अधिक फॅशनेबल (Fashion) आहे.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

SCROLL FOR NEXT