Belly Fat Tips Saam tv
लाईफस्टाईल

Belly Fat Tips : काहीही केल्या सुटलेल पोट कमी होत नाहीये ? रोज सकाळी खा हा पदार्थ, झपट्याने वितळेल चरबी

Home Remedies Reduce Belly Fat : हल्ली फास्टफूड व चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढत आहे.

कोमल दामुद्रे

Weight Loss Tips : हल्ली फास्टफूड व चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढत आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अनेकांच्या आहारात फास्टफूडचा अतिप्रमाणात वापर दिसून येतोय. एकीकडे फास्टफूड खातात तर दुसरीकडे वजन वाढण्याची तक्रार करतात. यामुळे कितीही प्रयत्न केला तरी पोटाची चरबी काही कमी होत नाही.

अनेकदा असे होते की, शरीराचा इतर भाग हा सपाट असतो परंतु, पोटाची चरबी काही कमी होत नाही. तासनतास जीममध्ये (Gym) वर्कआऊट करुनही वजन (Weight) काही कमी होत नाही. आपल्या खाण्यापिण्यावर बरेच जण नियंत्रण ठेवतात त्यासाठी विविध प्रिस्क्रिप्शनचा अवलंब करतानाही पाहिले असेलच. पण आम्ही तुम्हाला असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची वाढलेली पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल.

स्वयंपाकघरात वापरला जाणारा लसूण (Garlic) हा फक्त पदार्थाची चव वाढवत नाही तर तो तुमचे वजनही झपाट्याने कमी करतो. याच्या सेवनाने कसे फायदे होतात ते जाणून घेऊया

1. ऊर्जा वाढवणे

लसूण हा एक नैसर्गिक ऊर्जा बूस्टर आहे जे तुमच्या शरीरातील हट्टी कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्ही फीट राहता. लसूण चयापचय वेगवान करून वजन कमी करण्यास मदत करू शकते.

2. भूक कमी करते:

लसूण वारंवार भूक लागण्याची लालसा कमी करण्यास मदत करू शकते. ज्यामुळे तुमची भूक कमी होईल, त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही.

3. चरबी जाळण्यास उपयुक्त:

लसूण चरबी जाळण्यास खूप उपयुक्त ठरू शकते. लसणात आढळणारे संयुगे शरीरातील वाढलेली चरबी जाळण्यास मदत करते, ज्यामुळे ते तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात समाविष्ट करायला हवे.

4. शरीराला डिटॉक्सिफाय करा:

लसूण एक शक्तिशाली डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून काम करते, जे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करते आणि पचन सुधारते. रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते.

5. पोटाची चरबी कमी करण्यासाठी लसूण कसे वापरावे?

पोटाची हट्टी चरबी कमी करण्यासाठी सकाळी कच्चा लसूण खा. याशिवाय लसूण नैसर्गिक रक्त पातळ करण्याचे काम करते. लसूण उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी स्थिर ठेवण्यास देखील मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT