Relationship Tips saam tv
लाईफस्टाईल

Relationship Tips: मुलगा आपल्या प्रेमात पडलाय हे कसं जाणून घ्याल, मुलींनी फॉलो कराव्या या टीप्स!

Relationship Tips: नातं सुरु करण्यापूर्वी मुलींच्या मनात प्रश्न येतो की, जर एखाद्या मुलाला मी खरंच आवडते हे कसं कळेल? आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत

Surabhi Jagdish

एखाद्या नात्यामध्ये येण्यापूर्वी मुली आणि मुलाला हे जाणून घ्यायचं असतं की, खरंच आपला पार्टनर आपल्यावर प्रेम करतो की नाही. असं म्हणतात, प्रेमाच्या बाबतीत खरंच मुली जास्त विचार करतात. नातं सुरु करण्यापूर्वी मुलींच्या मनात प्रश्न येतो की, जर एखाद्या मुलाला मी खरंच आवडते हे कसं कळेल? जर तुम्हालाही याची चिंता वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज माहिती करून घेऊ शकता की, समोरचा मुलगा तुम्हाला आवडतो की नाही. ही लक्षणं नेमकी काय आहेत, ते जाणून घेऊया.

बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून

एखाद्या मुलाच्या बॉडी लँग्वेजवरून तो तुम्हाला आवडतो की नाही हे समजू शकतं. जर तो तुमच्याकडे प्रेमाने तुमच्याशी बोलत असेल किंवा तुमच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून जा की, तो मुलगा तुमच्या प्रेमात आहे.

बोलण्याकडे लक्ष द्या

याशिवाय तुम्ही त्याच्या बोलण्यावरूनही त्याचं तुमच्यावर प्रेम आहे का हे समजू शकता. जर त्या व्यक्तीने तुम्ही जे बोलता त्यामध्ये रस घेण्यास सुरुवात केली किंवा तुम्हाला मस्करीने चिडवलं तर त्याला तुम्ही आवडता.

सोशल मीडियावर कनेक्शन

जर तो मुलगा तुम्हाला सोशल मीडियावर सगळीकडे फॉलो करत असेल किंवा तुमच्या सगळ्या पोस्ट लाईक्स आणि कमेंट करत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्याने तुम्हाला लाईक करायला सुरुवात केली आहे.

तुमची अचानक चिंता करणं

जेव्हा मुलाला एखादी मुलगी आवडू लागते त्यावेळी तो तिची प्रचंड काळजी करू लागतो. अशावेळी मुलगा नेहमी तुमच्या तब्येतीची काळजी घेतो आणि तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये नसताना नर्व्हस होत असेल तर यावरून तुम्ही समजू शकता की तो त्या मुलाला तुम्ही आवडता.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; 'या' 9 उमेदवारांना मिळणार संधी | Video

Maharashtra News Live Updates : पुणे कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसकडून रमेश बागवे यांना उमेदवारी

Akkalkuwa Vidhan Sabha : अक्कलकुवा विधानसभेसाठी पेच कायम; महायुतीचा उमेदवार अद्याप ठरेना

VIDEO : मित्रपक्षानेच दिला भाजपला धक्का? माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलगी शिंदे गटात करणार प्रवेश

Sharad Pawar NCP 3rd Candidate List : परळीत शरद पवारांचे मराठा कार्ड, धनंजय मुंडे यांच्याविरोधात दिला तगडा उमेदवार; तिसऱ्या यादीत कोणाला संधी?

SCROLL FOR NEXT