Soft Chapati Tips saam tv
लाईफस्टाईल

Soft Chapati Tips: चपाती बनवताना खूप अडचणी येतात? गोल आणि मऊ चपात्यांसाठी 'ही' पद्धत लगेचच वापरा

Perfect Round Chapati Steps: मऊ, गोल आणि फुगलेली चपाती बनवण्यात अडचण येते? योग्य कणिक मळण्याची पद्धत, पीठाला विश्रांती देण्याची टिप आणि तव्यावर शेकण्याचा योग्य क्रम वापरून घरच्या घरी परफेक्ट चपाती बनवा.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्रात बऱ्याच घरांमध्ये रोज चपात्या तयार केल्या जातात. चपाती हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मऊ, गोल आणि फुगलेली चपाती बनवणं ही एक प्रकारची कलाच असते. पण जे लोक नुकताच स्वयंपाक शिकत असतात त्यांच्यासाठी चपाती बनवणं मोठं आव्हानात्मक वाटतं. कारण चपात्या त्यांना गोल लाटता येत नाही, पाण्याचा अंदाज चुकतो, त्या कडक होतात, नीट फुगत नाहीत. पण परफेक्ट चपाती बनवायला शिकण्यासाठी सुरुवात ही कणिक मळण्याच्या योग्य प्रक्रियेतून होते.

चपाती मऊ आणि लवचिक बनण्यासाठी पीठामध्ये थोडंसं मीठ आणि कोमट पाणी वापरा. त्याने पीठ जास्त मऊ आणि लवचिक बनते. पीठ मळून झाल्यानंतर त्याला किमान 15 ते 20 मिनिटे ओल्या कापडाने झाकून ठेवणं आवश्यक असते. या वेळेत पिठातलं ग्लूटेन सक्रिय होते, त्यामुळे चपाती लाटताना बेलताना तुटत नाही आणि बेलन सहज फिरते.

गोल चपाती बनवण्यासाठी पीठ पूर्णपणे गुळगुळीत करणे हा पहिला टप्पा मानला जातो. त्यानंतर चपाती लाटताना जास्त दाब देऊ नका. हलक्या हाताने चपातीच्या कडा बाहेरच्या बाजूने फिरवत लाटा. त्याने चपात्या नैसर्गिकरित्या गोल आकारात येतात. जर चपाती लाटताना चिकटत असेल तर थोड्या सुक्या पिठाचा वापर करा. पण जास्त प्रमाणात सुकं पीठ वापरल्यावर चपाती कडक होण्याची शक्यता असते.

चपाती योग्य प्रकारे शेकवण्यासाठी तव्याचं तापमानही महत्त्वाचं असतं. चपाती तव्यावर टाकण्याआधी तवा मध्यम आचेवर नीट गरम झालेला असावा. जर तवा थंड असेल तर चपाती कडक होते. चपातीच्या वरच्या बाजूला हलके फुगे दिसू लागले की ती पलटण्याची योग्य वेळ असते. पहिल्या बाजूने चपाती फक्त थोडीशी म्हणजे साधारण 20 टक्के भाजा. त्यानंतर ती पलटून दुसऱ्या बाजूने जवळपास पूर्ण म्हणजे 70 टक्के भाजा. दुसरी बाजू शिजल्यानंतर रोटी पुन्हा पलटून थेट आचेवर किंवा कापडाच्या मदतीने फुगवली तर ती छान फुगते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: 16 व्या मजल्यावरून तरूणी पडली; रक्ताच्या थारोळ्यात पडला निर्वस्त्र मृतदेह, कुटुंबियांकडून हत्येचा आरोप

Maharashtra News Live Update: शहरातील ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या निशाण्यावर

Mumbai Metro: मुंबई मेट्रोचा 337 किमीपर्यंत विस्तार होणार; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला भविष्यातील मास्टर प्लॅन

Parbhani Accident : झरी-जिंतूर मार्गावर हिट अँड रन; भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू

Shocking : संतपाजनक! खाऊ देण्याच्या बहाण्यानं नराधमानं डाव साधला; अत्याचार करून ७ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT