how to keep plants green tips in marathi, Gardening Tips and Tricks in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

बाहेर फिरायला जाताय तर अशी राखा झाडांची निगा

उन्हाळ्यात जितकी पाण्याची आवश्यकता आपल्याला हवी असते तितकीच झाडांना पण हवी असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कामानिमित्त किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण बाहेर फिरायला जातो पण, झाडांची निगा कशी राखावी हा प्रश्न भेडसावत असतो. उन्हाळ्यात जितकी पाण्याची आवश्यकता आपल्याला हवी असते तितकीच झाडांना (Plant) पण हवी असते. बऱ्याचदा बाहेर जाताना आपण झाडांकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे झाडे कोमेजून जातात. आपली झाडे टवटवीत राहावी यासाठी आपल्याला झाडांची काळजी वाटत असेल, तर आता आपण चिंता न करता घराबाहेर पडू शकतो. जोपर्यंत आपण बाहेर आहोत तोपर्यंत आपली झाडे हिरवीगार असतील. त्यासाठी आपल्याला फक्त झाडांच्या काळजीशी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स (Tips) पाळल्या हव्यात. (Gardening Tips and Tricks in Marathi)

हे देखील पहा -

बाहेर किंवा सुट्टीवर जाण्यापूर्वी या टिप्स वापरून पहा

१. आपल्या आजूबाजूला शेजारी किंवा मित्रांकडे आपण आपली झाडे काही दिवस सुरक्षित ठेवू शकतो.

२. सुट्टीवर (Holiday) जाण्यापूर्वी, झाडे अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येऊ शकेल. त्यामुळे बऱ्याच काळासाठी जमिनीत ओलावा टिकून राहिल तसेच झाडे कोरडे होण्यापासून प्रतिबंधित होतील.

३. घरातून बाहेर पडण्यापूर्वी झाडांना पुरेसे पाणी द्या, ज्यामुळे काही अंशी झाडांच्या गरजा काही प्रमाणात पूर्ण करता येतील.

- उष्णतेपासून आपल्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी सोप्या युक्त्या

१. जुन्या बाटलीच्या झाकणाला आणि बाटलीला काही ठिकाणी छिद्र करा. या बाटलीत पाणी घालून आपल्या बाल्कनीत जिथे झाडे असतील तिथे अडकवून ठेवा. झाडांना पुरेसे पाणी मिळत राहील व ते कोमेजणार नाहीत.

२. झाडांना पाणी दिल्यानंतर ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, त्यांना ओल्या कापडाने झाकून ठेवा.

३. एक मोठा टब पाण्याने भरुन त्यात झाडे ठेवा. पाण्याचे टब आपण अशा ठिकाणी ठेवायला हवे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कमी येत असेल. तसेच उघड्या टबमध्ये डासांची उत्पत्ती होण्याचा धोका टाळण्यासाठी, एक कप पाण्यात हायड्रोजन पेरॉक्साइड आणि डिशवॉशचे काही थेंब घाला आणि स्प्रे बाटलीमध्ये भरुन ठेवा. हव्या त्यावेळी टबच्या पाण्यावर आपण फवारणी करु शकतो.

४. तसेच सुती कापडाचे जाड लांब तुकडे करा. कापडाचे एक टोक पाण्याने भरलेल्या बादलीत आणि दुसरे टोक झाडात ठेवा. असे केल्यास झाडांना पुरेसे पाणी मिळेल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT