Eye care Tips, How To Improve kids eye vision, eye health, eye yoga  Saam Tv
लाईफस्टाईल

Tips For Eyesight : कमी वयात मुलांना चष्मा लागलाय? या टीप्स फॉलो करा, डोळे राहातील निरोगी

Natural Ways to Help Improve Vision and Eye Health : लहान मुलांमध्ये स्मार्टफोन आणि स्क्रिन टाइमच्या वाढत्या वापरामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे बहुतेक लहान मुलांना चष्मा लागला आहे. त्यामुळे दृष्टीदेखील कमी होऊ शकतो. परंतु, याचे प्रमाणात फक्त मुलांमध्ये नाही तर तरुणांमध्ये देखील वाढत आहे.

कोमल दामुद्रे

Tips To Improve Your Eyesight :

बदलेल्या जीवनशैलीनुसार हल्ली भारतात ९० टक्के लोकांना चष्मा लागला आहे. कमी वयात डोळ्यांनी धूसर दिसणे किंवा डोळ्यांच्या इतर आजारांचा सामना करावा लागतो.

लहान मुलांमध्ये स्मार्टफोन आणि स्क्रिन टाइमच्या वाढत्या वापरामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे बहुतेक लहान मुलांना चष्मा लागला आहे. त्यामुळे दृष्टीदेखील कमी होऊ शकतो. परंतु, याचे प्रमाणात फक्त मुलांमध्ये नाही तर तरुणांमध्ये देखील वाढत आहे.

कामाच्या व्यापामुळे स्क्रीनसमोर तासनतास बसल्याने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतोच पण त्यामुळे आपल्या डोळ्यांवर (Eye) परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी (Care) घ्यायली हवी हे जाणून घेऊया.

1. डोळ्यांचा नियमित व्यायाम

डोळे निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी डोळ्यांचा व्यायाम करा. यासाठी तुम्हाला डोळे मिचकावणे आणि डोळे फिरवणे यांसारखा व्यायाम करता येईल.

2. स्क्रीन टाइम कमी करा

स्क्रीनवर सतत काम केल्यामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो. यासाठी स्क्रीन टाइम कमी करावा. स्क्रीन वेळ कमी करण्यासाठी २०-२०-२० नियम फॉलो करा. डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी दर २० मिनिटांनी २० फूट दूर असलेल्या गोष्टींकडे पाहा.

3. प्रकाश

वाचताना किंवा काम करताना अंधारात काम करु नका. अधिक चकाकणारे दिवे टाळा. तसेच लॅपटॉप आणि फोनमधून (Phone) निघणारा प्रकाश डोळ्यांसाठी अतिशय धोकादायक असतो.

4. हायड्रेट राहा

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेट राहाणे अधिक गरजेचे आहे. आपली दृष्टी सुधारण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

5. सनग्लासेसचा वापर

सूर्याच्या अतिनील किरणांचा डोळ्यांवर परिणाम होतो. ज्यामुळे डोळ्यांचे नुकसान होते. या किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेसचा वापर करा.

6. आहार

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात देखील बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि ई तसेच झिंक आणि ओमेगा -३ फॅटी अॅसिड सारख्या खनिजांचा समावेश करायला हवा. तसेच हिरव्या पालेभाज्या, गाजर आणि लिंबूवर्गीय फळांचा आहारात वापर करा. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT