ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते. ते डोळ्यांना संसर्गापासून वाचवते. डोळ्यांचे कार्य सुधारण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
अंड्यांमध्ये ल्युटीन आणि व्हिटॅमिन ए असते. ते डोळ्यांसाठी चांगलं असतं. त्यामुळे रोज अंडी खाणं फायदेशीर असतं.
हिरव्या पालेभाज्याचं सेवन केल्यानं ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे दोन महत्त्वाचे पोषकतत्व मिळतात.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी अॅसिड असतात. ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
माशांमध्ये भरपूर ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही फिश ऑइल सप्लिमेंट्स वापरू शकता.
आपल्या डोळ्यांसाठी फळे देखील खूप जास्त फायदेशीर असतात. फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.