Mobile चोरीला गेल्यास कसा शोधायचा? अन् मोबाईलमधील महत्वाची अकाउंट कसे ब्लॉक करायचे? वाचा Saam TV
लाईफस्टाईल

Mobile चोरीला गेल्यास कसा शोधायचा? अन् मोबाईलमधील महत्वाची अकाउंट कसे ब्लॉक करायचे? वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजकाल आपले सर्व व्यवहार मोबाईलद्वारे पार पडतात मग ते वीज बिल (Electricity Bill) असो कोणाला पैसे पाठवायचे असो की खायला काही मागवायचं असो प्रत्येक गोष्ट एका क्लिकवरती आपण करु शकतो आणि त्यासाठा गरजेचा आहे फक्त एक मोबाईल.

आणि तोच मोबाईल (Mobile) आता आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनला आहे. पेटीएम, Google Pay, फोन पे यांसारख्या विविध Apps आपण वापरतो. या अॅप्सचा उल्लेख इथे केला कारण ही अॅप्सचा वापरताना आपली सर्व महत्वाची माहिती आपण मोबाईलद्वारे त्या कंपनीला शेअर केलेली असते आणि त्यामुळेच जर कधी आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला तर आपले मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास आपलं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काय करावं लागेल याची आपण माहिती घेऊयात. आपला मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास सर्वात आधी 18004190157 या क्रमांकावर संपर्क करा. यानंतर यामधील अदर कॉल (Other Call) चा ऑप्शन निवडून थेट कॉल सेंटरशी संपर्क साधा. त्यांना आपल्याकडील बँकेसंदर्भातील योग्य माहिती द्या आणि आपलं गुगल पे आणि फोन पे किंवा पेटीएम अकाऊंट बंद करा.

हे देखील पहा -

याशिवाय आपण स्वत: www.android.com/find या वेबसाईटवर जाऊन तिथे आपण आपला मोबाईल लॉकेशन ट्रेस करु शकतो आपलं लोकेशन सुरु असेल तर ही लिंक आपणाला थेट आपल्या मोबाईलचे स्थान दर्शवतो जर ते नसेल तर मग आपण तिथेच देण्यात आलेल्या इरेज डिव्हाइस (Erase Device) या पर्यायावर क्लिक करा आणि आपले सर्व अकाऊंट मोबाईलमधून बंद करा.यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान टळू शकतच तसचं इतर महत्वाची गुपित देखील सुरक्षित राहू शकतात.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT