ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हार्ट अटॅक हा सामान्यतः वृद्धांचा आजार मानला जातो.
आजकाल, तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी वयातच हार्ट अटॅक येण्याची अनेक कारणे असू शकतात.
तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याची कारणे कोणती, जाणून घ्या.
तरुणपणात हार्ट अटॅक येण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब लाइफस्टाइल. कमी वयात लठ्ठपणामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.
जास्त प्रमाणात जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
याशिवाय, सततचा ताण आणि झोपेचा अभाव, यामुळे देखील हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.
जास्त वेळ बसून राहिल्याने तसेच शारिरीक हालचालीचा अभाव यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.