ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या वाढत आहे. आजकाल, चुकीच्या खाण्याच्या सवयी, बदलती जीवनशैली, ताणतणाव, रात्री उशिरा झोप यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
४० वर्षांनंतर पुरुषांना वंध्यत्वाच्या समस्या वाढत्या प्रमाणात जाणवत आहेत. नैसर्गिकरित्या स्पर्म काऊउंट वाढवणण्यासाठी दररोज हे पदार्थ खा.
पुरुषांनी त्यांच्या आहारात अंडी, मासे, चीज, दूध, दही यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ समाविष्ट करावेत.
वेळेवर झोपणे आणि उठणे आवश्यक आहे. रात्री उशिरा झोपल्याने शुक्राणूंच्या संख्येवरही परिणाम होऊ शकतो.
व्हिटॅमिन डीची कमतरता शुक्राणूंच्या संख्येवर देखील परिणाम करू शकते. भरपूर सूर्यप्रकाश घ्या आणि व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थ खा.
पुरुषांनी ड्राय फ्रुट्स खावेत, कारण यामध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवणारे पोषक घटक असतात.
जर तुम्ही दारू पित असाल किंवा सिगारेट ओढत असाल तर याचा परिणाम शुक्राणूंच्या संख्येवर देखील होतो. यासाठी धुम्रपान आणि मद्यपान करु नका.