तंत्रज्ञानाच्या जलद विस्तारामुळे मोबाइल टीव्हीशी कनेक्ट करणे खूप सोपे झाले आहे. बहुतेक लोक मोबाईलमधील व्हिडिओ किंवा फोटो मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी टीव्हीशी कनेक्ट करतात. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनऐवजी टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर फोटो किंवा व्हिडिओ पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. (Connect Mobile with Smart Tv)
स्मार्टफोनप्रमाणेच आजकाल बाजारात असे अनेक स्मार्ट टीव्ही आहेत जे स्मार्टफोनशी जोडले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष तंत्रज्ञानाची गरज नाही. तुम्ही वायरसह किंवा त्याशिवाय मोबाईलसोबत टीव्ही लिंक करू शकता.
स्मार्टफोनला टीव्हीशी कसे कनेक्ट करावे: सध्याचे बहुतेक टीव्ही अंगभूत इंटरनेट सपोर्टसह बाजारात येतात. तसे, वापरकर्ते त्यांचा स्मार्टफोन टीव्हीवर कास्ट करू शकतात. तुम्ही प्राइम व्हिडिओ , यूट्यूब , नेटफ्लिक्स आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सारखे अॅप वापरू शकता. तसेच तुम्ही स्ट्रीमिंग स्टिक वापरून गॅलरी अॅपवरून त्यांच्या स्मार्टफोनवरील फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतात. बाजारात अनेक स्ट्रीमिंग उपकरणे उपलब्ध आहेत. अशाप्रकारे तुम्ही आपले स्मार्टफोन अशा टीव्हीशी कनेक्ट करू शकतात ज्यामध्ये इन-बिल्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही.
अँड्रॉइड स्मार्टफोनला टीव्हीशी वायरलेस पद्धतीने कसे कनेक्ट करावे Android स्मार्टफोनला टीव्हीशी कनेक्ट करणे खूप सोपे आहे. सध्याच्या स्मार्टफोन्स आणि टीव्हीमध्ये तंत्रज्ञान वापरण्यास सोपे आहे.
स्क्रीनकास्ट वापरून कनेक्ट करा: अनेक Android स्मार्टफोनमध्ये स्क्रीनकास्ट फिचर उपलब्ध असते. ज्याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण फोन स्क्रीन टीव्हीवर दाखवू शकता. यासाठी, स्क्रीन मिररिंग दोन्ही उपकरणांवर सक्षम केले जाऊ शकते आणि टीव्हीशी कनेक्ट केले जाऊ शकते. स्क्रीनकास्ट कसे सक्षम करायचे ?
सेटिंग्ज अॅप लाँच करा किंवा सूचना मेनूवर खाली स्वाइप करा.
स्क्रीनकास्ट किंवा कास्ट टॉगल शोधा.
तुम्ही सेटिंग्ज अॅपमध्ये कास्ट फिचर देखील शोधू शकता. सेटिंग्जमध्ये फक्त पर्याय शोधा.
एकदा सुरु केल्यावर, तुम्ही कनेक्ट करू इच्छित टीव्ही निवडू शकता.
हे देखील पहा-
केबलद्वारे कनेक्ट करा
- बहुतेक स्मार्ट टीव्हीमध्ये एचडीएमआय पोर्ट (HDMI Port ) असतो, तुम्ही मायक्रो एचडीएमआय किंवा मायक्रो यूएसबी केबलद्वारे टीव्हीला फोनशी कनेक्ट करू शकता.
-जर तुम्ही Apple iPhone वापरत असाल, तर तुम्ही Apple चे डिजिटल AV अडॅप्टर वापरू शकता. हे तुम्हाला मोबाईलला टीव्हीच्या HDMI पोर्टशी कनेक्ट करून देईल.
-वायरद्वारे टीव्हीला मोबाईलशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पासवर्ड किंवा वायफाय कनेक्शनची आवश्यकता नाही. अनेक वायफाय केबल 15 फूट किंवा त्यापेक्षा कमी आहेत, परंतु बाजारात लांब HDMI केबल्स उपलब्ध आहेत, तुम्ही तुमच्या सोयीनुसार केबल निवडा.
केबलशिवाय कनेक्ट करा
-बाजारात असे अनेक गॅजेट्स उपलब्ध आहेत जे तुमच्या टीव्हीला स्मार्टफोनशी जोडू शकतात. गुगल क्रोमकास्ट (Google Chromecast) हे असेच एक उपकरण आहे. हे उपकरण ऑनलाइन सहज उपलब्ध आहे. तसेच 1000-1500 रुपयांमध्ये सहज उपलब्ध आहे.
-Apple TV किंवा Amazon Fire TV मध्ये तुमचा गोंधळ होणार नाही हे लक्षात ठेवा. Chromecast डोंगल स्वतःहून काहीही करणार नाही. हे फक्त तुमच्या मोबाईलला टीव्हीशी जोडेल. तुम्ही मोबाईलमध्ये जे काही कराल ते टीव्हीवर दिसेल.
-Chromecast चा वापर iOS उपकरणांसाठीही केला जाऊ शकतो.
-क्रोमकास्ट व्यतिरिक्त तुम्ही Roku 2, Miracast Video Adapter देखील वापरू शकता, याशिवाय बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.