माधव सावरगावे
औरंगाबाद: जिल्ह्यात हुरडा पार्ट्या, रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवर होणाऱ्या पार्ट्यावर बंदी आणण्यात आलीय. शिवाय शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालय, मॉल्स, मोठी दुकान या ठिकाणी मोठी गर्दी आढळून आल्यास त्याच ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आलीय. लग्नांमध्ये केवळ पन्नास लोकांना परवानगी देण्यात आली आहे. जर गर्दी अधिक दिसून आली तर लगेच कारवाई केली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पूर्णा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तसे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत.
नियमावली-
1) कोविड टेस्ट positive आल्यावर रुग्णाला गृह विलगीकरणात (Home isolation) राहायचे असेल तर घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण असणे बंधनकारक.
2) घरातील इतर सदस्यांनी Home Quartine राहणे बंधनकारक (इतर सदस्यांनी बाहेर फिरू नये)
3) गर्दीवर नियंत्रण ठेवा. हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. सभा, कार्यक्रमहॉटेल, रिसॉर्ट मधील गर्दीचे चित्रीकरण करा.
4) हुरडापार्टीवर पूर्णपणे निर्बंध. हुरडा पार्टी सुरू असल्यास पोलीस कार्यवाही करणार. (पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त)
5) शहराबाहेरील फार्म हाऊस/ रिसॉर्टवर बंदी. सुरू दिसल्यास पोलीस कार्यवाही होणार (पोलीस अधीक्षक)
6) मंगल कार्यालयाने आगामी लग्नाच्या booking ची माहिती प्रशासनाला कळवावी. 50 पेक्षा जास्त गर्दी होणार नाही याचे मंगल कार्यालयाने Under taking द्यावे लागणार. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कार्यवाही होणार. (पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक)
7) मास्क घातले नाहीत म्हणून कारवाई पोटी आजपर्यंत 1875 वाहन चालकांचे license रद्द केले यापुढे ही कार्यवाही सुरू राहणार. कार्यवाही झाल्यास वाहन विक्री करता येणार नाही (संजय मैत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी)
8) लसीकरण आणि मास्क शिवाय पेट्रोल नाही.
9) सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द.
10) शहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेटी द्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.