Cleaning Hacks : आपल्या प्रत्येकाच्या घरात चांदीचं एखादं तरी भांड हे असतचं. त्याची काळजी घेण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. परंतु, धूळ किंवा खराब पाण्यामुळे त्याची चकाकी निघून जाते व ते भांड काळे पडते. अशावेळी आपण त्या भांड्यांना पुन्हा नव्यासारखे करण्यासाठी सोनाराच्या दुकानात जाऊन जास्त पैसे खर्च करतो.
परंतु, आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील (Kitchen) असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्याच्या मदतीने आपण त्याची चकाकी पुन्हा आणू शकतो व त्याचा वापर करु शकतो. जाणून घेऊया कसे ते.
1. बेकिंग सोडा आणि अॅल्यूमिनियम फॉइल
चांदीला स्वच्छ (Clean) करण्यासाठी सगळ्यात मस्त व स्वस्त असा उपाय म्हणजे बेकिंग सोड्याचा वापर. सगळ्यात आधी पाणी (Water) उकळवून घ्या. आता चमकणारी बाजू वरच्या बाजूला ठेवून अॅल्युमिनियम फॉइल लावा करा. यानंतर भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा एक कप पाण्यात टाकून त्यात चांदीच्या वस्तू टाका. साधारण ५ मिनिटे असेच राहू द्या. आता वस्तू बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
2. लिंबू-मीठ
लिंबू व मीठाचा वापर चांदीच्या वस्तू नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी केला जातो. यासाठी एका भांड्यात 3 टेबलस्पून मीठ आणि कोमट पाणी घालून लिंबू पिळून घ्या. या पाण्यात चांदीची भांडी घालून 10 मिनिटे तसेच ठेवा. नंतर बाहेर काढून मऊ कापडाने पुसा.
3. टोमॅटो केचप
घरातील चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी केचपचा वापर करता येतो. कागदाच्या टॉवेलमध्ये केचप घेऊन ते काळे झालेल्या भागावर घासायचे आहे. चांदी स्वच्छ नसल्यास, केचप त्यावर 15 मिनिटे राहू द्या नंतर मऊ कापडाने पुसा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.