How to clean oily plastic box, Kitchen tips and tricks in Marathi, Kitchen Tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : प्लास्टिकच्या भांड्यांवरील तेलाचे डाग कसे काढाल?

हल्ली बाजारात अनेक पध्दतीचे डबे आपण टिफिन किंवा इतर पदार्थांसाठी आपण वापरतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात प्लास्टिकचे डबे आपल्याला पाहायला मिळतात. स्वयंपाकघरात प्लास्टिकचे डबे किंवा जार असतात. किराणा साठवण्यासाठी नॉनस्टिक बरण्या असोत किंवा साधे प्लास्टिकचे डबे. हल्ली बाजारात अनेक पध्दतीचे डबे आपण टिफिन किंवा इतर पदार्थांसाठी आपण वापरतो. त्यावर पडणाऱ्या तेलाचे डाग सहज निघत नाही. या स्वयंपाकघरातील भांड्यांवर तेलाचे डाग पडणे ही साधी गोष्ट आहे. परंतु, ते रोज स्वच्छ करणे अवघड आहे. प्लास्टिकच्या डब्यावर डाग पडले असतील तर ते कमी वेळेत साफ करण्याच्या काही सोप्या युक्त्या आहेत. या सोप्या युक्त्यांच्या मदतीने आपण प्लास्टिकचे डबे सहज स्वच्छ करू शकतो. किचनमध्ये (Kitchen) ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यांवरील हट्टी डाग कसे साफ (Clean) करायचे हे पाहूया. (Kitchen tips and tricks in Marathi)

हे देखील पहा -

किचनमध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यांवरील हट्टी डाग असे साफ करा.

१. प्लास्टिकच्या डब्यांवरील हट्टी डाग काढण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करु शकतो. एका भांड्यात बेकिंग सोडा पाणी घेऊन त्याची पेस्ट बनवा. डब्यावरील डागावर ३० मिनिटे राहू द्या. अर्ध्या तासानंतर पुसा किंवा धुवा.

२. प्लास्टिकच्या डब्यांवरील डाग काढण्यासाठी आपण मीठचा वापरता करु शकतो. डाग काढण्यासाठी कोमट पाण्यात (Water) मीठ टाकून कापड बुडवा व डागांवर घासून घ्या. डाग पूर्णपणे निघाले नसतील तर ही प्रक्रिया दोन किंवा तीन वेळा करा.

३. डाग काढण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरू शकतो. यासाठी अल्कोहोल असणारे हँड सॅनिटायझर उपयुक्त ठरू शकते. डाग असलेल्या जागेवर हँड सॅनिटायझर लावा आणि २ मिनिटे राहू द्या. त्यानंतर भांडे पुसून स्वच्छ करा.

४. तसेच डाग काढण्यासाठी आपण व्हाईट व्हिनेगरही वापरु शकतो. त्यासाठी व्हाईट व्हिनेगर एक कप पाण्यात घाला आणि थोड्या वेळासाठी प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. यानंतर प्लास्टिकचे कंटेनर चांगल्या पाण्याने धुवा. डाग निघाले नसतील तर ते रात्रभर पाण्यात ठेवा.

अशाप्रकारे आपण प्लास्टिकच्या डब्यावरील हट्टी डाग आपण काढू शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Bath Tips: थंडीत गरम पाण्याने की थंड पाण्याने अंघोळ करणं योग्य आहे?

Shocking: मुंबई हादरली! निवृत्त जवानाकडून १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता २ महिन्यांची गरोदर

Samruddhi Mahamarg : धक्कादायक! एकीकडे पाय, दुसरीकडे तोंड; समृद्धी महामार्गा लगत आढळला २ तुकड्यात मृतदेह

Rava Kesari Halwa Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला काय करायचं? बनवा हॉटेल स्टाईल सॉफ्ट टेस्टी रवा केशर हलवा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : फाटकी नोट घेतली नाही, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर उगारली तलवार

SCROLL FOR NEXT