Choose the Idol of Ganesha Saam TV
लाईफस्टाईल

Choose the Idol of Ganesha : गणपती बाप्पा आणताना 'ही' चूक करू नका; हसत्या-खेळत्या घरात येईल दु:ख

How to Choose Ganesh Idol for Home : गणपती मूर्ती खरेदी करताना आपल्याकडून कोणत्याही चुका होऊ देऊ नका. या चुकांचा थेट परिणाम तुमच्या घरावर होऊ शकतो.

Ruchika Jadhav

गणपती बाप्पा घरी येण्यासाठी फक्त २ दिवस शिल्लक राहिले आहेत. घरांमध्ये आणि मंडळांमध्ये मखर बनवण्याची तयारी सुरू आहे. तसेच मूर्तीकार सुद्धा गणपती आणि गौरी मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत. बाप्पाच्या सेवेसाठी सर्वच सज्ज झालेत. मात्र तुम्हाला माहितीये का गणपती मूर्ती खरेदी करताना काही विशेष काळजी घेतली पाहिजे.

गणपती मूर्ती खरेदी करताना आपल्याकडून कोणत्याही चुका होऊ देऊ नका. या चुकांचा थेट परिणाम तुमच्या घरावर होऊ शकतो. आपलं घर कायम हसतं खेळतं रहावं आणि गणेशाची आपल्यावर कृपादृष्टि असावी असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे मूर्ती घरेदी करताना आणि घरी आणताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

बसलेली मूर्ती खरेदी करा

गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही घरामध्ये आणत असाल तर बसलेली मूर्ती खरेदी करा. बाप्पाची मूर्ती बसलेल्या अवस्थेतील असल्यास आपल्या घरासाठी ते शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये धनसंपत्ती आणि भरभराट येते.

सोंड तापासा

गणपती बाप्प्याची सोंड कोणत्या दिशेला आहे त्यानुसार मूर्तीची निवड केली पाहिजे. उजव्या दिशेला सोंड असलेली मूर्ती म्हणजे जागृक आणि अत्यंत कडक स्वभावाचा गणपती असं म्हटलं जातं. तर डावीकडे सोंड असल्यास गणपती शांत, तल्लख बुद्धी असलेला मानला जातो. त्यामुळे घरी बाप्पाची मूर्ती आणत असाल तर सोंड डाव्या दिशेला असलेली मूर्ती खरेदी करा.

मूषकराज

गणपती बाप्पाचं वाहन म्हणजे मूषकराज होय. त्यामुळे मूर्ती खरेदी करताना त्यावर शेजारी मूषकराज आहे की नाही हे तपासून पाहा. मूषकराज नसल्यास अशी मूर्ती आपल्या घरी घेऊन येऊ नका. गणपती बाप्पाने तुमच्या घरातील सर्व विघ्न दूर करावी असे तुम्हाला वाटत असेल तर मूर्तीसह मूषकराज यांची छोटीशी मूर्ती सुद्धा तुम्ही घरी आणू शकता.

मूर्ती घरी घेऊन येताना चेहरा झाका

गणरायाची मूर्ती जेव्हा तुम्ही घरी घेऊन येता तेव्हा तिचा चेहरा उघडा ठेवू नका. आपले बाप्पा सगळ्यांपेक्षा निराळे आणि वेगळे असतील तरी देखील मूर्तीचं चेहरा लाल रंगाच्या कापडाने झाकून घ्या. तसे न केल्यास बाप्पाची सुबक मूर्ती परिसरातील व्यक्ती बाहेरच पाहतील आणि घरी दर्शनासाठी जास्त व्यक्ती येणार नाहीत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT