Fashion tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

झुमका गिरा रे बरेली के बाजार में

फॅशन जसं जशी बदलत जाते तसं तशी त्याचे नवनवीन ट्रेंड आपल्याला बाजारात आपल्याला पाहायला मिळतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : झुमके म्हटलं की, आपण महिला त्यांच्या आकार व फॅशन बदल नेहमी जागरुक असतो. फॅशन (Fashion) जसं जशी बदलत जाते तसं तशी त्याचे नवनवीन ट्रेंड (Trend) आपल्याला बाजारात आपल्याला पाहायला मिळतात.

हे देखील पहा -

काही अॅक्सेसरीज अशा आहेत की, ज्या नेहमी ट्रेंडमध्ये असतात जसे की झुमके, चोकर इ. पण कानातले ही अशीच एक ऍक्सेसरी आहे, जी आपण प्रत्येक आउटफिटसोबत कॅरी करू शकतो. आपल्याला बाजारात अनेक प्रकारचे कानातले सापडतील पण सध्या सिल्व्हर कानातले घालण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे, जो आपण पारंपारिक पोशाखांसोबत सहज घालू शकता. ते निवडायचे कसे हे जाणून घेऊया.

१. साधे कानातल्याची खरेदी न करता आपण गोल आकाराच्या झुमक्याची खरेदी करु शकते. गोल आकाराचे कानातले घालण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. या कानातल्यांमध्ये आपल्याला गोल, चौकोनी आकारात किंवा चंद्राच्या आकारात अनेक प्रकारचे कानातले आपल्याला सहज मिळतील. ती निवडताना आपण आपल्या चेहऱ्याच्या रचनानुसार आपण करावा. चेहरा लहान असेल तर आपण मध्यम आकाराचे कानातले खरेदी करू शकतो. तसेच चेहरा गोल असेल तर आपण मोठ्या आकाराचे कानातले निवडू शकतो.

२. जर आपण पारंपारिक पोशाख घालत असू तर आपण स्टोन डिझाइनमधील झुमके निवडू शकतो. स्टोन इअररिंग्स केवळ शरारा सूट किंवा सलवार सूटवरच छान दिसत नाहीत तर ते आपल्याला स्टायलिश लुक ही देईल.

३. सिल्व्हर कलरमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे झुमके मिळतील, पण जर आपण हेवी सूट घालत असू तर त्यासोबत मोठे कानातले नक्कीच चांगले दिसतील. लांब झुमकी आपल्याला पार्टी वेअर लूक देण्याचे काम करतात.

४. याशिवाय आपण मिरर वर्क इअरिंग्ज देखील खरेदी करू शकतो. या मिरर वर्क इअररिंग्समध्ये आपल्याला अनेक प्रकारचे डिझाईन्स मिळतील. मिरर वर्क इअररिंगमध्ये मिरर डिझाइन केले जातात. हे इअररिंग्स दिसायला खूप स्टायलिश दिसते.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune toxic liquor case: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

Mumbai Hill Station : मुंबईजवळचं सिक्रेट हिल स्टेशन! पावसाळ्यात निसर्गाचा घ्या मनमुराद आनंद

Pune : “खाऊन-पिऊन आंदोलन करा" नरहरी झिरवळांचा उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नागपुरात

Famous Actor Death : मनोरंजन विश्वातील आणखी एक तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT