Lic Part Time Job
Lic Part Time Job Saam TV
लाईफस्टाईल

LIC Part Time Job: LIC सोबत वीकेंडला फक्त काही तास करा काम, दर महिना होईल 80 हजारपेक्षा जास्त कमाई

Satish Kengar

LIC Part Time Job: जर तुमच्याकडे सुट्टीच्या दिवशी चार ते पाच तासच वेळ असेल आणि या वेळेत तुम्हाला पैसे कमवायचे असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही एलआयसीमध्ये सामील होऊन दरमहा ८४,००० रुपये अतिरिक्त पैसे कमावू शकता.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याचा तुमच्या नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही आणि तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल. हे काम तुम्ही पूर्णवेळ देखील करू शकता.

हा विमा एजंट म्हणून पार्ट टाइम जॉब आहे. हे काम अर्धवेळ आणि पूर्णवेळ दोन्ही करता येते. कामाला मर्यादा नाही आणि कमाईलाही मर्यादा नाही. एलआयसी एजंटची कमाई विम्यावर चांगले कमिशन मिळाल्याने होते.  (Latest Marathi News)

Lic Part Time Job: शैक्षणिक पात्रता : १२वी पासून असणं आवश्यक

तुम्हाला एलआयसीचे एजंट व्हायचे असेल तर तुम्ही किमान १२वी पास असणं महत्वाचं आहे. एजंट होण्यासाठी तुम्हाला ४ रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो, वयाचा पुरावा, शिक्षणाचा पुरावा, पॅन कार्ड आणि आधार कार्ड तपशील कागदपत्रे म्हणून द्यावा लागेल.

Lic Agent Commission : ३५ टक्के कमिशन, दरवर्षी उत्पन्न वाढेल

एलआयसी आपल्या विमा एजंटना पॉलिसीवर जास्तीत जास्त ३५ टक्के कमिशन देते. तुम्हाला १०,००० रुपयांच्या प्रीमियमसह विमा पॉलिसी मिळाल्यास पहिल्या वर्षी त्यातील ३५ टक्के कमिशन म्हणजेच ३५०० रुपये मिळतील.

त्यानंतर दुसऱ्या वर्षी पॉलिसीचा प्रीमियम जमा केल्यावर तुम्हाला ७.५ टक्के कमिशन म्हणजेच ७५० रुपये मिळतील. यानंतर पॉलिसी जितक्या वर्षांपर्यंत चालेल, तुम्हाला प्रत्येक वेळी प्रीमियमच्या ५ टक्के कमिशन मिळेल, म्हणजेच ५०० रुपये.

एलआयसीचा एजंट होण्याचा एक फायदा म्हणजे तुमची एक पॉलिसी तुम्हाला पुढील १० ते १५ आणि २० वर्षे सतत उत्पन्न देते. जर तुम्ही दरवर्षी नवीन एलआयसी पॉलिसी योग्य पद्धतीने करत असाल आणि तुमची जुनी पॉलिसीही वेळेवर रिन्यू झाली तर तुमचे उत्पन्न दरवर्षी वाढते. एलआयसीच्या पॉलिसीवर एजंटचे कमिशन पॉलिसीच्या प्रकारानुसार ठरविले जाते.

एलआयसी प्रामुख्याने दोन प्रकारच्या पॉलिसी योजनांची विक्री करते. एक एंडोमेंट योजना आहे आणि दुसरी मनी बॅक योजना आहे. एलआयसी एजंटला काही विशेष पॉलिसींवर पहिल्या प्रीमियमच्या ३५ टक्के कमाल कमिशन मिळते. नवीन एंडोमेंट प्लॅन्स, टर्म प्लॅन्स, हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आणि चाइल्ड प्लॅन्सवर २५ टक्के कमिशन मिळते. तसेच एलआयसी पेन्शन योजनेवर एजंटला २ टक्के कमिशन देखील देते.

जर तुम्हाला हे गणित समजले असेल तर एलआयसी एजंट म्हणून दरमहा ८४,००० रुपये कमवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सुट्टीच्या दिवशी किमान २ पॉलिसी विकावी लागतील. म्हणजे तुम्हाला सुट्टीच्या ८ दिवसांत दररोज १ पॉलिसी विकावी लागेल. जर पहिल्या प्रीमियमचे ३५ टक्के कमिशन उत्पन्न मानले गेले, तर तुम्हाला एका महिन्यात किमान २.४ लाख रुपयांचा व्यवसाय एलआयसी म्हणजेच प्रीमियममध्ये आणावा लागेल. यावर तुम्हाला प्रीमियम म्हणून ८४,००० रुपयांचे थेट उत्पन्न मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

SCROLL FOR NEXT