Siddhi Hande
सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या रिल्स व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक रिल्स या रेसिपीच्या असतात.
सध्या सोशल मीडियावर अननस फ्राय रेसिपी खूप व्हायरल होत आहे. आंबट-गोड अननस फ्राय तुम्ही घरीदेखील बनवू शकतात.
सर्वात आधी तुम्हाला अननस कापून घ्यायचे आहे. त्याचे गोलाकार तुकडे करायचे आहेत. अननसमधील मधला भाग तुम्ही काढूनदेखील टाकू शकतात.
यानंतर एका बाऊलमध्ये अननसाचे काप टाका. त्यात लाल तिखट, चाट मसाला, साखर, मीठ आणि लिंबाचा रस टाका.
हे सर्व मिश्रण या अननसांना व्यवस्थित लावून घ्या. यामध्ये तुम्ही थोडं तेल वापरा जेणेकरुन हे मिश्रण कापांना चिटकेल.
यानंतर तुम्हाला एक पॅन घ्यायचा आहे. त्यावर तेल किंवा बटर लावा.
यानंतर त्यावर मॅरिनेट केलेले अननसाचे काप शॅलो फ्राय करुन घ्या.
हे अननसाचे काप दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत फ्राय करुन घ्या. हे आंबट गोड अननस फ्राय खूप मस्त लागतात.