Siddhi Hande
स्ट्रीट स्टाईल पावभाजी, तवा पुलाव तर सर्वांनाच आवडतो. तुम्ही असाच स्ट्रीट स्टाईल पुलाव घरीच बनवू शकतात.
भात, चिरलेला कांदा, टॉमेटो, शिमला मिरची, गाजर, वाटाणे, बटाटे, आलं लसूण पेस्ट, पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस
सर्वात आधी तुम्हाला एक मोठा तवा घ्यायचा आहे. तवा नसेल कढईत तेल आणि बटर टाका.
यानंतर यामध्ये चिरलेला कांदा टाका. यात थोडं जिरेदेखील टाकून छान परतवून घ्या.
यानंतर आलं-लसूण पेस्ट टाकून एकजीव करुन घ्या. त्यात टॉमेटो टाकून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
यानंतर यामध्ये शिमला मिरची, गाजर, मटार आणि उकडलेला बटाटा घालून परतवून घ्या.
यामध्ये लाल तिखट, पावभाजी मसाला, हळद आणि मीठ टाकूम मिक्स करा.
यामध्ये शिजवलेला भात घाला. हा भात हलक्या हाताने परतवून घ्या. यानंतर वरुन लिंबाचा रस टाका.
यावर कोथिंबीर टाकून छान गार्निश करा. हा पुलाव तुम्ही खाऊ शकतात.