ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्ट्रॉबेरी आईसक्रिम हे एक लोकप्रिय डेजर्ट आहे जे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. हे तुम्ही घरच्या घरी सोप्या पध्दतीने बनवू शकता.
फ्रेश स्ट्रॉबेरी, क्रिम, दूध, साखर आणि व्हॅनीला एसेंस इत्यादी साहित्य लागते. साखरेच्या जागी तुम्ही मध किंवा मेपल सिरपचा वापर करु शकता.
सर्वात आधी स्ट्रॉबेरी धुवून घ्या. धुतल्यानंतर त्या कापा आणि मिक्सरमध्ये स्ट्रॉबेरीची बारिक प्यूरी बनवून घ्या.
एक बाऊल घ्या त्यात साखर आणि क्रिम जोपर्यंत हलके आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत मिश्रण फेटून घ्या.
क्रिम मिश्रणात स्ट्रॉबेरी प्युरी आणि व्हॅनीला एसेंस मिक्स करा. आता मिश्रणाला एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून ६ ते ८ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
बर्फाचे खडे तयार होऊ नयेत म्हणून आईस्क्रीम अधूनमधून ढवळत रहा.
आईस्क्रीम घट्ट झाल्यावर स्कूपने सर्व्ह करा आणि त्यावर तुमचे आवडीचे टॉपिंग्स टाका.
आईस्क्रीम खाण्याचा आनंद घ्या तसेच तुम्ही ही रेसिपी तुमच्या पध्दतीने ट्विस्ट देऊन किंवा नवीन फ्लेर्वस अॅड करुन प्रयोग करु शकता.