Health yandex
लाईफस्टाईल

Health: व्यायाम किंवा योगानंतर किती वेळाने अंघोळ करावी, योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

After Workout Bath Tips: योग किंवा व्यायाम शरीर आणि मन दोन्हीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चुकीच्या व्यायामामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. इतकंच नाही तर योगा किंवा वर्कआऊटनंतर काही काम केल्यानेही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यापैकी एक म्हणजे व्यायाम किंवा योगानंतर लगेचच आंघोळ करणे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्यायाम किंवा योगाभ्यास केल्याने शरीराला ऊब मिळते. यामुळे शरीरात ऊर्जा संचारते ज्यामुळे तापमान वाढते.अनेकदा लोक सकाळची कसरत किंवा योगा केल्यानंतर लगेच पाणी पितात किंवा नाश्ता करतात. अशा स्थितीत योगानंतर लगेच काही काम करू नये. जास्त शारीरिक हालचालींनंतर ताबडतोब पाणी पिणे किंवा खाणे टाळण्याचा सल्ला तज्ञ देतात. आंघोळीसाठीही हाच सल्ला दिला जातो.  योगासने किंवा व्यायाम केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. जाणून घेऊया याचे कारण आणि योगानंतर किती वेळाने स्नान करावे.

योगानंतर आंघोळ केव्हा करावी

योगाभ्यास किंवा सराव केल्यानंतर किमान ३० मिनिटांनी आंघोळ करावी.  योगासने करण्यापूर्वी किंवा नंतर लगेच आंघोळ करू नये.

कारण

योगासने केल्याने शरीरात जी ऊर्जा संचारते त्यावर आंघोळीचा परिणाम होतो.  योग केल्याने कधी शरीर गरम होते तर कधी थंड होते आणि लगेच आंघोळ केल्याने शरीराचे तापमान वाढू शकते असेही तज्ज्ञांचे मत आहे.

योगानंतर आंघोळ केल्याचे तोटे

योगाभ्यास केल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने वायू, पित्त, कफ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तापमानातील बदलामुळे सर्दी-खोकलाही होऊ शकतो.

योग करण्यापूर्वी आंघोळ

योगासन करण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीरातील थकवा कमी होतो आणि अंतर्गत ऊर्जा आणि लक्ष केंद्रित होते.  याच्या मदतीने व्यक्ती अधिक एकाग्रतेने आणि उर्जेने योग करू शकते. मात्र योगाभ्यास करण्यापूर्वी लगेच आंघोळ करू नका. योगासने करण्यापूर्वी तुम्ही ३० मिनिटे आंघोळ करू शकता.

योगानंतर लगेच काय करू नये

योगा केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि घाम येतो.  ताबडतोब आंघोळ केल्याने पचनसंस्था कमजोर होऊ शकते. योगानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटात जडपणा, दुखणे आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. २०मिनिटांच्या योगाभ्यासानंतर हळूहळू पाणी प्या. योगासने केल्यानंतर किमान एक तासाने काही पौष्टिक अन्न सेवन केले पाहिजे.  तेलकट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळावेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by - अर्चना चव्हाण

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

SCROLL FOR NEXT