Skin Care: 'या' फळांच्या साली वापरल्याने तुमच्या चेहऱ्यावर येईल चमक, पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही पडणार!

Skin Care Tips: हिवाळ्यात आपली त्वचा देखील पूर्णपणे कोरडी आणि निर्जीव होऊ लागते.अशा परिस्थितीत काही नैसर्गिक पद्धतींनी तुम्ही चमकदार आणि मुलायम त्वचा मिळवू शकता.
Skin
Skinyandex
Published On

हिवाळ्यात आपल्याला अनेक आजार जडतात. या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात आपली त्वचा देखील पूर्णपणे कोरडी आणि निर्जीव होऊ लागते. यासाठी मुली बाजारातून महागडे पदार्थ खरेदी करतात. ज्यामध्ये रसायने असतात.  याचा तुम्हाला ताबडतोब फायदा होऊ शकतो परंतु दीर्घकाळासाठी ते हानिकारक आहेत. अशा परिस्थितीत काही नैसर्गिक पद्धतींनी तुम्ही चमकदार आणि मुलायम त्वचा मिळवू शकता.

ते तुमच्या त्वचेतील मृत पेशी देखील काढून टाकतात. ज्या फळांची साले तुम्ही निरुपयोगी समजून फेकून द्याल ती तुमच्या चेहऱ्याला आश्चर्यकारक चमक देईल.आम्ही तुम्हाला अशा काही फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांची साल तुमच्या त्वचेच्या आरोग्याची काळजी घेते. चला जाणून घेऊया त्या फळांच्या सालींबद्दल

संत्र्याची साल

लहानपणापासून आपण सर्वजण वाचत आलो आहोत की संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते.  हे त्वचेला नैसर्गिक चमक देण्याचे काम करते. तुम्ही संत्र्याची साल सुकवून पावडर बनवा.  यानंतर गुलाब पाण्यात मिसळून फेस पॅक बनवा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल. तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.

केळीची साल

केळ्याच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म चेहरा आतून स्वच्छ करतात. हे डाग दूर करण्यास आणि चेहरा चमकदार बनविण्यात देखील मदत करते. केळीची साल तुमच्या चेहऱ्यावर तीन ते चार मिनिटे हलक्या हाताने चोळा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही साले लहान तुकडे करून, मधात मिसळा आणि चेहऱ्याला लावा.

सफरचंदाची साल

सफरचंद हे व्हिटॅमिन ए, सी आणि कॉपरचाही चांगला स्रोत आहे. हे देखील नैसर्गिकरित्या चेहरा उजळण्याचे काम करते. तुम्ही त्याच्या सालीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावू शकता. हे आठवड्यातून दोनदा करू शकता. हे अँटी-एजिंगसाठी देखील फायदेशीर आहे. तसेच तुमची त्वचा चमकदार आणि मुलायम बनते.

Skin
Health News: २६% कमी होईल हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका, झोपण्यापू्र्वी केवळ 'या' सवयी सुधारा

डाळिंबाची साल

डाळिंब आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते. डाळिंबाचा आहारात समावेश केल्यास रक्तक्षय तर दूर होतोच, शिवाय चेहऱ्यावर गुलाबी चमकही येते. त्याच्या सालीबद्दल बोलायचे झाले तर ते अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे.  जे मुरुमे दूर करते. तुम्ही त्याची दुधात पेस्ट बनवून चेहऱ्याला लावू शकता.

ही खबरदारी घ्या

साले नीट धुऊन झाल्यावरच वापरा. पॅच टेस्ट करा. पॅक लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by - अर्चना चव्हाण

Skin
Hyperthyroidism: हायपोथायरॉईडीझम म्हणजे काय? याचे परिणाम जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com