Sleep Awareness saam tv
लाईफस्टाईल

Heart Disease: कमी झोपेमुळे तुम्हीच देताय हार्ट अटॅकला आमंत्रण, ह्रदयाचे आणि झोपेचे नाते काय? जाणून घ्या

Heart Attack: कमी झोपेमुळे शरीरात ताण वाढतो आणि हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढतो. पुरेशी झोप घेणं म्हणजे शरीर आणि मनाच्या आरोग्याचं सर्वात सोपं औषध आहे.

Sakshi Sunil Jadhav

कमी झोपेमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

कमी झोपेमुळे ताण वाढून रक्तदाब बिघडतो.

चांगली झोप शरीराच्या दुरुस्ती प्रक्रियेसाठी अत्यावश्यक आहे.

झोप वाढवण्यासाठी मोबाइल आणि टीव्हीचा वापर झोपण्यापूर्वी टाळावा.

सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनाचा थेट तुमच्या झोपवर परिणाम होत असतो. कामाचा ताण, मोबाइल आणि लॅपटॉपचा अतिवापर, सोबत सततचा मानसिक ताण यामुळे अनेकांची झोप उडालेली असते. पण तुम्हाला माहित आहे का, सतत कमी झोप घेणे फक्त थकवा आणि डोकेदुखीच नव्हे तर गंभीर हृदय विकारालाही आमंत्रण देऊ शकते का? जाणून घ्या.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शालिनी सिंग यांच्या मते, "झोप ही आपल्या शरीरासाठी औषधासारखी असते. झोपेत असताना शरीर दुरुस्तीच्या अवस्थेत जाते आणि हार्मोन्सचं संतुलन पुन्हा तयार होतात." म्हणजेच चांगली झोप ही शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.

जेव्हा शरीराला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा शरीरात अनेक जैविक बदल होतात. झोपेचा अभाव असल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होतो. Stress Hormones वाढतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीने वाढू शकतो. झोपेचा अभाव रक्तातील साखरेचं प्रमाण बिघडवतो. मग डायबिडीज आणि नंतर हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

कमी झोपेमुळे संपूर्ण शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. सततचा थकवा, डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव, लठ्ठपणा वाढणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि वारंवार सर्दी-खोकल्याचे त्रास हे सर्व झोपेच्या अभावामुळे होऊ शकतात.

आरोग्य टिकवण्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी काही सवयींमध्ये बदल गरजेचा आहे. दररोज ठरलेल्या वेळी झोपणं आणि उठणं, झोपण्यापूर्वी मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर टाळणं, हलका व्यायाम आणि योगांचा समावेश करणं, रात्री हलका व पौष्टिक आहार घेणं आणि झोपण्यापूर्वी ध्यान किंवा शांत संगीत ऐकणं याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मुस्लिम बहुल भागात भाजपकडे उमेदवारच नाही

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीनं भरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज, VIDEO

कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिेवशी शहरात मोठी बंडखोरी

Chanakya Niti: या 5 कारणांमुळे आयुष्यातला आंनद जाईल निघून, चाणक्यांनी सांगितलं सुखी होण्याचं गुपित

Horoscope Wednesday: 31st ठरणार गेमचेंजर, ५ राशींच्या पैशाच्या समस्या होणार दूर, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT