Cyst In Uterus saam tv
लाईफस्टाईल

Cyst In Uterus: गर्भाशयातील गाठ किती गंभीर असू शकते? महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?

Cyst In Uterus: महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येणारी समस्या म्हणजे गर्भाशयात गाठ होणं. गर्भाशयात गाठ असल्याने कोणत्या समस्या जाणवतात आणि त्यावर कसे उपचार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिलीये.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. चुकीचा आहार आणि बैठी जीवनशैली यामुळे बऱ्याच अवयवांवर परिणाम होतात. आजकाल महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येणारी समस्या म्हणजे गर्भाशयात गाठ होणं. याचा परिणाम गर्भधारणेवर होतो.

काही महिलांमध्ये असं दिसून येतं की गर्भधारणेदरम्यान गर्भाशयात गाठ होते. अशा प्रकारच्या समस्येला तोंड देण्यासाठी महिलांनी त्यांच्या जीवनशैलीची आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गर्भाशयात गाठ असल्याने कोणत्या समस्या जाणवतात आणि त्यावर कसे उपचार आहेत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिलीये.

याबाबत नागपूरमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दिपा अंकुशे म्हणाल्या की, गर्भाशयात सामान्यपणे फायब्रॉईडची गाठ दिसून येते. अनेक महिलांना या गाठीचा त्रास होतो. ही गाठ कॅन्सरची आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी या गाठीचा तुकडा आणि पेशी तपासणीसाठी पाठवण्यात येतात. ज्या महिलांच्या गर्भाशयात ही गाठ असते, त्या महिलांना मासिक पाळीमध्ये वेदना, पाळीमध्ये अनियमितता तसंच गर्भाशय खाली येण्याची समस्या जाणवते.

जर ही गाठ मोठी असेल तर महिलांना गर्भधारणेच्या काळात देखील समस्या जाणवतात. सध्याच्या काळात तरूण मुलींमध्ये गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यावर उपचार म्हणून पहिल्यांना गोळ्यांचा पर्याय निवडला जातो. मात्र गाठ मोठी असेल आणि महिलेचं वय जास्त असेल तर गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो.

गर्भाशयात गाठ असल्यावर काय केलं पाहिजे?

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, गर्भाशयातील गाठीच्या आकारानुसार उपचार केले जातात. गर्भाशयात गाठ असेल तर नेमकं काय केलं पाहिजे ते पाहूयात.

नियमित व्यायाम करा

गर्भाशयात गाठ असल्यास महिलांनी व्यायामाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. व्यायामामुळे आरोग्य सुधारतं. याशिवाय गर्भाशयात असणाऱ्या गाठीची स्थिती नियंत्रित राहण्यास मदत होते.

योग्य ते उपचार घेणं गरजेचं

गर्भाशयात गाठ असल्यास घरगुती उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांकडून उपचार करा. यामुळे त्या गाठीचं योग्य निदान होण्यास मदत होऊ शकते. जेणेकरून त्यावर योग्य प्रकारचे उपचार करता येऊ शकतात.

कोणत्या गोष्टी करणं टाळलं पाहिजे?

वजन नियंत्रणात ठेवा

गर्भाशयात गाठ असल्यास त्याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. यावेळी वजन वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. वजन वाढल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

चांगला आहार घेणं गरजेचं

जर कोणत्या महिलेला हा त्रास असेल तर आहाराच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये महिलेला मधुमेह किंवा थायरॉईड सारखी समस्या असल्यास शरीरात हार्मोनल असंतुलन होऊ शकतं. अशा स्थितीत गर्भाशयातील गाठीची स्थितीही बिघडू शकते. त्यामुळे योग्य तो आहार घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT