Monsoon Hair Care saam tv
लाईफस्टाईल

Monsoon Hair Care: पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? ही 1 चूक ठरू शकते केस गळतीचं कारण

Hair wash routine: पावसाळ्यात केस किती वेळा धुवावेत, कोणता शॅम्पू वापरावा आणि केस गळणे, कोंडा व टाळूवरील संसर्ग कसा टाळावा? तज्ज्ञांनी सांगितलेल्या सोप्या आणि प्रभावी हेअर केअर टिप्स जाणून घ्या आणि केस निरोगी ठेवा.

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळ्यात फक्त आरोग्य आणि त्वचेचीच नाही तर केसांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळे केस पटकन चिकट होतात, घाम येतो आणि टाळूवर घाणही साचते. त्यामुळे अनेक जण वारंवार केस धुतात, तेल लावतात, हेअर पॅक वापरतात किंवा वेगवेगळी हेअर प्रॉडक्ट्स वापरतात. पण केस किती वेळा धुवावेत, याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं.

खरं तर पावसाळ्यात रोज केस धुतल्याने केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे केस कोरडे आणि निस्तेज दिसू शकतात. दुसरीकडे, खूप दिवस केस न धुतल्यास टाळूवर घाण, घाम आणि तेल साचून संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे केस गळण्याचाही त्रास होऊ शकतो.

पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

स्किन आणि हेअर केअर तज्ज्ञ शहनाज हुसेन यांच्या मते, पावसाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणं योग्य ठरतं. यासाठी शक्यतो माइल्ड आणि अँटी-फंगल शॅम्पू वापरावा. त्यामुळे टाळू स्वच्छ राहतो आणि फंगल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

पावसाळ्यात केस नियमित धुणं महत्त्वाचं आहे. कारण टाळूवर नैसर्गिक तेल (सीबम) जास्त प्रमाणात तयार होतं. त्यात घाम आणि धूळ मिसळल्याने टाळूशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांनी रोज केस धुणं टाळावं.

पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल?

  • केस नेहमी स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडे ठेवा.

  • पावसात केस भिजले असतील तर घरी आल्यावर स्वच्छ पाण्याने केस धुवा आणि व्यवस्थित सुकवा. पावसाच्या घाणेरड्या पाण्यामुळे टाळूला संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

  • केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा.

  • केस पुसण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेलचा वापर केल्यास केसांवर कमी ताण येतो.

  • ओले केस विंचरू नका आणि ओले असतानाच घट्ट बांधूही नका.

  • जास्त प्रमाणात तेल लावू नका. केस धुण्याच्या १५ ते २० मिनिटे आधी हलक्या कोमट तेलाने टाळूची मालिश करा.

  • कोंडा किंवा बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी अँटी-फंगल शॅम्पू किंवा हेअर पॅक वापरू शकता. मात्र, कोणताही अँटी-फंगल शॅम्पू वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT