How much water to drink in a day, Benefits of water ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

दिवसभरात पाणी किती प्रमाणात प्यायला हवे? पाणी प्यायल्यामुळे शरीराला नेमका फायदा कसा होतो?

पाणी प्यायल्यामुळे शरीराला नेमका फायदा कसा होतो?

कोमल दामुद्रे

मुंबई : शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पाणी करते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

हे देखील पहा -

तज्ज्ञांच्या मते, पाणी योग्यरित्या प्यायल्याने शरीराल हायड्रेट ठेवत पण त्याच बरोबर आपल्या रक्तदाबाची पातळी देखील नियंत्रणात ठेवू शकते. शरीर जेव्हा पूर्णपणे हायड्रेट असते तेव्हा हृदय संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यात अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करते. पुरेसे प्रमाणात पाणी न पिल्याने आपल्या आजाराच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. आपण भरपूर पाणी प्यायल्याने थकवा, उच्च रक्तदाब, चिंता व नैराश्यसारख्या आजारांपासून मात करता येते. पाणी प्यायल्याने आपल्याला त्याचा फायदा कसा होतो हे जाणून घेऊया.

१. दररोज आठ ग्लास पाणी प्यायल्याने आपल्याला उच्च रक्तदाबापासून दूर राहण्यास मदत होते. पाणी शरीरातील विघटक बाहेर काढण्यास मदत करते. तसेच, शरीरात वाढलेले सोडियम देखील निघून जाण्यास मदत होते.

२. पुरेसे प्रमाणात पाणी प्यायल्याने आपल्याला सांधेदुखीचा होणारा त्रास कमी होतो. डिहायड्रेशनच्या समस्येमुळे सांधे दुखीची समस्या उद्भवते.

३. शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजनची कमतरता होऊ लागते. ऑक्सिजन हे शरीरातील वेगवेगळ्या भागात पोहचवण्याचे काम करते. त्यासाठी सतत पाणी पिणे गरजेचे आहे.

४. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने आपल्या त्वचेला (Skin) व केसांना त्याचा फायदा होतो. शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते. मुरुमे, त्वचा कोरडी पडणे यांसारख्या त्वचेच्या होणाऱ्या समस्येवर मात करता येते.

५. तसेच पाण्याच्या अभावामुळे मायग्रेन, अपचन, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, आणि लठ्ठपणा यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी आपण पुरेसे पाणी दररोज प्यायल्या हवे.

६. रिकाम्या पोटी पाणी (Water) प्यायल्याने आपली चयपचय दर वाढून पचनसंस्था सुधारण्यास मदत होते त्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT