Benefits of vitamin d, Vitamin d overdose ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

शरीराला किती प्रमाणात 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते? त्याचे अधिक सेवन केल्यास नुकसान कसे होईल, जाणून घ्या

शरीरातील ड जीवनसत्त्वाची पातळी कशी व किती प्रमाणात वाढवाल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या शरीरातील जीवनसत्त्व कमी झाल्यावर आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी जीवनसत्त्वे आपल्या शरीरासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

हे देखील पहा -

ड जीवनसत्त्वामुळे शरीरातील दात, मज्जातंतू आणि स्नायू बळकट होतात. आतड्यातील कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातात जमा करण्याचे काम करते. तसेच पुरेसे प्रमाणात सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. कर्करोगापासून संरक्षण होते. परंतु, शरीरातील ड जीवनसत्त्व वाढवण्यासाठी आपण काही औषधांचे (Medicine) सेवन करतो. पण याचे शरीरात अधिक प्रमाण झाले तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

शरीरातील ड जीवनसत्त्वाची पातळी कशी व किती प्रमाणात वाढवाल ?

तज्ज्ञांनी असे सांगितले आहे की, आठवड्यातून किमान दोनदा तरी अर्धा तास कोवळ्या उन्हाच्या संपर्कात यायला हवे. त्यामुळे आपल्याला शरीराला मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळून ड जीवनसत्त्व वाढू शकते. सूर्यात ड जीवनसत्त्वाचे उत्तम स्त्रोत आहे. ड जीवनसत्त्व हाडांच्या आरोग्यासाठी, कॅल्शियम शोषण्यासाठी आणि पॅराथायरॉइड ग्रंथींना आधार देण्यासाठी महत्त्वाचे काम करते. तसेच याचे सप्लिमेंटचे पुरेसे प्रमाणात सेवन केल्यास आपल्याला कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो. सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्त्व तयार होते. पूरक आहार घेण्यापूर्वी आपण ड जीवनसत्त्वाची पातळी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ड जीवनसत्त्वाच्या उच्च डोसमुळे फ्रॅक्चर आणि व अनेक आजारांना बळी पडण्याचा धोका वाढतो.

ड जीवनसत्त्वांची कमतरता -

शरीरातील ड जीवनसत्त्वाची (Vitamins) पातळी कमी झाल्यावर आपल्याला काही सामान्य लक्षणे आढळून येतात. यामध्ये आपल्याला थकवा, हाडे दुखणे, स्नायूचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, मूड बदलणे आणि नैराश्य यांचा समावेश होतो. मुलांमध्ये याच्या तीव्र कमतरतेमुळे मुडदूस होतो ज्यामुळे त्यांची वाढ चुकीच्या पद्धती होते, स्नायू कमकुवत होतात, हाडांमध्ये वेदना आणि सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: पैशांसाठी सरकारी मदत घेऊन तुम्ही सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दर महिना होईल तगडी कमाई

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा

VIDEO : शरद पवारांना परळीत जातीपातीचं राजकारण करायचंय, धनंजय मुंडेंचा नाव न घेता घणाघात

Cabbage Benefits: कोबी खाल्ल्याने शरीराला मिळतात 'हे' मोठे जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Titeeksha Tawade: हिच्या एका नजेरनं केलं घायाळ, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहा!

SCROLL FOR NEXT