How many times can you pass gas saam tv
लाईफस्टाईल

Gas Problem: दिवसातून १० ते १२ वेळा पोटातून गॅस सोडणं किती धोकादायक? वाचा रिसर्च काय सांगतो

How many times can you pass gas : शरीरात तयार होणाऱ्या गॅसचं प्रमाण किती आहे हे जाणून घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. पोटात गॅस जास्त प्रमाणात तयार होणं ही काही वेळा आरोग्यासाठी गंभीर बाब ठरू शकते, असं तज्ज्ञ सांगतात.

Surabhi Jayashree Jagdish

वाढत्या वयानुसार, अनेकांना गॅसेसची समस्या होते. पोटातून गॅस सोडणं ही एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. मात्र तुम्हाला किती प्रमाणात गॅस होतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पोटात जास्त गॅस असेल तर ती चिंतेची बाब मानली जाते. त्यामुळे दिवसभरात किती गॅस तयार होतोय हे पाहा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या आर्टिकलमध्ये आत दिवसभरातून किती वेळा गॅस सोडला पाहिजे हे जाणून घेऊया.

फार्टिंग का होतं?

पचनक्रियेमुळे फार्ट होतो हे ज्ञात आहे. खरं तर जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा तुमचं शरीर त्याचं पोषक द्रव्यांमध्ये विभाजन करतं. या दरम्यान काही पदार्थ लहान आतड्यांमध्ये पूर्णपणे पचत नाहीत. हे न पचलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात. जिथे आतडे बॅक्टेरिया त्यांना फर्मेंट करतात आणि पोटातून गॅस सोडतात.

या प्रक्रियेदरम्यान नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, मिथेन इत्यादी अनेक प्रकारचा मिश्र वायू तयार होतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी तुम्ही जलद गतीने खाणं खाता किंवा कार्बोनेटेड पेयांचं सेवन करता तेव्हा तुमही खाल्लेली हवा देखील अतिरिक्त गॅस तयार होण्यास कारणीभूत ठरू शकते.

१ दिवसात किती वेळा बाहेर पडतो गॅस?

गॅस सोडण्याची प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलते. जर्नल ऑफ क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, गॅस बाहेर पडण्याची सरासरी पाहिली तर निरोगी व्यक्ती दररोज 10-20 वेळा पोटातून गॅस बाहेर सोडते.

युरोपियन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपेटोलॉजीमधील अजून एका अभ्यासानुसार, जे लोक जास्त फायबरयुक्त आहार घेतात त्या व्यक्ती अधिक गॅस सोडू शकतात. या व्यक्ती दिवसातून 25-30 वेळा गॅस बाहेर सोडतात. त्यामुळे जर तुमच्या पोटातून 10 ते 20 वेळा गॅस सोडत असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही.

पोटामध्ये गॅस होण्याची कारणं

सोयाबीनचे, डाळ, ब्रोकोली, कोबी तसंच धान्य अशा उच्च फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने जास्त अधिक प्रमाणात गॅस होतो. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, कार्बोनेटेड ड्रिंक्स प्यायल्यानेही जास्त गॅस तयार होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT