Narayana Murthy Saam tv
लाईफस्टाईल

Narayana Murthy: तरुणांना ७० तास काम करायला सांगणारे नारायणमूर्ती किती तास काम करतात? पत्नी सुधा मूर्ती म्हणाल्या...

70th Hours a week : नारायण मूर्ती म्हणतात, तरुणांनी ७० तास काम करण्याची तयारी ठेवा.

कोमल दामुद्रे

Business News :

इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताची काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे असे म्हटले. त्यासाठी तरुणांनी ७० तास काम करण्याची तयारी ठेवा.

पॉडकास्ट 'द रेकॉर्ड' वर मोहनदास पै यांच्या मुलाखतीत मूर्ती म्हणाले की, भारताला उत्पादकता सुधारण्याची गरज आहे. नारायण मूर्तीच्या यांच्या या विधानावर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतरांना ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती तास काम करायचे? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. इन्फोसिसचे सह संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी अवघ्या १० हजार रुपयांमध्ये इन्फोसिसची कंपनी (Company) सुरु केली होती.

1. त्याग करणे अधिक गरजेचे

एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की, ते सकाळी ६.२० वाजता इन्फोसिस कॅम्पसमध्ये पोहोचायचे. तर रात्री ९ वाजेपर्यंत कार्यालयात काम करत बसायचे. त्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये अधिक वेळ (Time) काम करण्याची संधी मिळायची.

तसेच ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्यासाठी प्रवृत्त करायचे. यावर त्यांना विचारले असता की, ऑफिसमध्ये एवढा वेळ देऊनही तुम्ही कुटुंबाला वेळ कसा दिला. त्यावर ते म्हणाले, व्यवसाय (Business) करणे सोपे यामध्ये अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो.

2. सुधा मूर्ती काय म्हणाल्या?

सुधा मूर्ती म्हणाल्या की, आठवड्याभरात ८० ते ९० तास ते काम करतात. त्यांनी कधीही यापेक्षा कमी काम केले नाही. त्यांनी मेहनतीवर विश्वास ठेवला. तसेच त्यांच्या या मताला जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी देखील समर्थन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Sunset Places: ऐन थंडीत निर्सगाच्या सानिध्यात तुम्हालाही sunset चा आनंद घ्यायचाय, तर मुबंईजवळील या स्थळांना नक्की भेट द्या

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT