Reason Behind Vastu Dosha saam tv
लाईफस्टाईल

Vastu Dosha : कसा आणि कधी घरावर लागू शकतो वास्तू दोष? खास लक्षणंही दिसून येतात, जाणून घ्या

Reason Behind Vastu Dosha : वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की, घरात वास्तुदोष असेल तर त्याचा थेट परिणाम घरातील लोकांवर जीवनावर होतो. तुम्ही कधी विचार केलाय का हा वास्तू दोष का निर्माण होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वास्तूचा आपल्या जीवनावर आणि कामावर परिणाम होतो. त्यासाठी आपण घरातील वास्तू दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो. वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की, घरात वास्तुदोष असेल तर त्याचा थेट परिणाम घरातील लोकांवर जीवनावर होतो. या दोषाचा आरोग्य, पैसा, नातेसंबंध आणि करिअर यासह जीवनाच्या प्रत्येक गोष्टींवर नकारात्मक प्रभाव पडतो.

ज्यावेळी घरामध्ये वास्तुदोष असतो तेव्हा केवळ आर्थिक आणि मानसिक समस्या निर्माण होत नाही तर कुटुंबातील सर्व सदस्यांना याचा त्रास होतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का हा वास्तू दोष का निर्माण होतो.

वास्तू दोष कधी निर्माण होतो?

घरामध्ये वास्तू दोष निर्माण होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे घराचा असा कोणताही भाग आहे जिथे दिवसभर सूर्यप्रकाश पोहोचत नाही. जर तुमच्या घरात अशी जागा असेल जी नेहमी अंधारात असेल तर वास्तू दोष निर्माण होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणाहून नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे घराच्या वातावरणावर परिणाम होतो.

त्याचप्रमाणे घरातील स्वयंपाकघर आणि पुजेच्या ठिकाणी घाण साचून राहत असेल तर ही समस्या येऊ शकते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शूज आणि चप्पल ठेवल्यास हा देखील वास्तुदोष म्हणून गणला जातो.

वास्तू दोषाची लक्षणं

घरामध्ये वास्तुदोषाची अनेक लक्षणं तुम्हाला दिसून येऊ शकतात. घरात राहणाऱ्या कोणत्याही सदस्याची तब्येत सतत बिघडत राहिली आणि आजार बरा होत नसेल तर ते वास्तू दोषाचं लक्षण असू शकते. त्याचप्रमाणे जर कुटुंबाची आर्थिक स्थिती अचानक बिघडत असेल किंवा काही कारणास्तव घरात सतत गरीबी किंवा कर्जाची समस्या येत असेल तर हे देखील लक्षण आहे. मानसिक तणाव, परस्पर वाद, कुटुंबातील सदस्यांमध्ये शांतता नसणं हे देखील वास्तू दोषाचं लक्षण मानलं जातं.

वास्तू दोषाचा प्रभाव काय पडतो?

वास्तुदोषाचा प्रभाव फक्त घरापुरता मर्यादित राहत नाही तर हा दोष कुटुंबातील सदस्यांच्या कामावर आणि आयुष्यातील इतर क्षेत्रांवरही परिणाम करतो. यामध्ये नोकरीच्या बाबतीत, प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात. ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही. त्याचप्रमाणे व्यवसायावर परिणाम होऊ तोटा वाढतो आणि आर्थिक नुकसान होऊ लागतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर-मुंबई विमान सेवा आठवड्यातून फक्त दोन दिवस

Periods Care : पीरियड्समध्ये करा 'हा' एकच रामबाण उपाय, त्वचेवर खाज अन् पुरळ येणारच नाही

Marathi Actress Harassment: त्याने अचानक मला पकडलं; मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला भयंकर प्रकार

High Blood Pressure : वजन वाढले, चक्कर आली; असू शकतो हाय BP चा धोका; काय आहेत ५ मुख्य लक्षणे?

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकलं; १० भारतीयांचा मृत्यू, केंद्र सरकारची माहिती

SCROLL FOR NEXT