Horoscope 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Horoscope 2023 : येणाऱ्या 2023 च्या वर्षात चमकेल 'या' 5 राशींचे भविष्य, अपूर्ण स्वप्न देखील होतील पूर्ण !

यात आपल्याला प्रत्येक व्यक्तीला जाणून घ्यायचे असते की येत्या वर्षात त्याचे भविष्य कसे असेल.

कोमल दामुद्रे

Horoscope 2023 : २०२२ च्या शेवटच्या महिन्यात आपण सगळेच जण पदार्पण करत आहोत तर, नवीन वर्षाची चाहूल आपल्या प्रत्येकालाच आहे. येणाऱ्या वर्षात नवीन कोणत्या गोष्टी करायच्या, जीमचे प्लानिंग, वेकेशन, नवीन अजेंड, नवं काहीतरी करण्याची इच्छा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचे वेध आपल्याला लागलेले असतात.

येणाऱ्या नव्या वर्षात आपली राहिलेली अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असेल. त्यासाठी आपण पुन्हा नव्याने योजना आखली असेल परंतु, यात आपल्या भाग्याने देखील साथ द्यायला हवी. यात आपल्याला प्रत्येक व्यक्तीला जाणून घ्यायचे असते की येत्या वर्षात त्याचे भविष्य कसे असेल. नोकरी, व्यवसाय (Business), धनलाभ, जमीन-मालमत्ता, आरोग्य (Health) अशा अनेक बाबतीत वर्ष कसे जाईल. आज आम्ही तुम्हाला 2023 मधील अशाच काही राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यासाठी नवीन वर्ष खूप लकी असणार आहे.

1. मेष

Aries
  • मेष राशीच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष अधिक आनंददायी असेल. या वर्षी त्यांच्या जवळपास सर्व इच्छा पूर्ण होतील.

  • व्यावसायिकांना नवीन कल्पनांमध्ये यश मिळून चांगला नफा मिळू शकतो. वर्षभर नशीब तुमच्या सोबत राहील.

  • ज्यामध्ये तुम्ही तुमचे पूर्ण आणि अपूर्ण काम पूर्ण करू शकाल. या वर्षी तुम्ही गेल्या वर्षीपेक्षा जास्त पैसे कमवू शकाल.

  • समाजात खूप मानसन्मान मिळेल. राजकारणात असणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष यशस्वी म्हणता येईल. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना यंदा यश मिळू शकते.

2. सिंह

Leo
  • सिंह राशीच्या लोकांना सूर्य आणि शनि या दोन्ही ग्रहांचा विशेष आशीर्वाद मिळेल.

  • वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी सूर्य पाचव्या स्थानात प्रवेश करणार आहे. तर जन्मकुंडलीच्या सातव्या घरात शनिची उपस्थिती पाहायला मिळेल.

  • 2023 मध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन नोकरी शोधणाऱ्यासाठी चांगली संधी मिळेल.

  • व्यवसायात तुम्हाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती राहील.

3. तुला

Libra
  • तूळ राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष खूप चांगले राहील. तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक नव्या संधी मिळतील.

  • या वर्षी तुम्ही सर्व प्रकारच्या सुखसोयींचा आनंद घेऊ शकाल. नोकरदार लोकांच्या पगारात आणि पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • वर्षाच्या मध्यात तुम्हाला अचानक आर्थिक लाभाच्या अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात.

  • या वर्षी तुम्ही जमीन आणि इतर गुंतवणूक योजनांमध्ये चांगली गुंतवणूक कराल ज्यामध्ये तुम्हाला यशही प्राप्त होईल.

4. धनु

Sagittarius
  • धनु राशीच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष वरदानापेक्षा कमी नसेल.

  • वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला शनीच्या साडे सातीपासून मुक्ती मिळेल. या वर्षी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात आणि करिअरमध्ये चांगले पैसा कमवाल.

  • 2023 हे वर्ष खूप भाग्यवान ठरणार आहे. या वर्षी तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असेल.

  • ज्याच्या मदतीने तुम्ही आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकाल. काही नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले राहील.

5. कुंभ

Aquarius
  • व्यवसायाच्या दृष्टिकोनातून 2023 हे वर्ष खूप चांगले असेल, जे लोक व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष नवीन आजमावण्याचे असेल.

  • या वर्षी तुम्हाला खूप प्रगती आणि पैसा मिळवण्याच्या संधी मिळतील.

  • 2023 हे वर्ष छान जाईल. तुम्हाला कुटुंबातील सर्वांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही नेहमी जे हवे होते ते करू शकाल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT