Skin Care SAAM TV
लाईफस्टाईल

Skin Care : सणासुदीला चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? शून्य रुपयात मिळवा चमकणारी त्वचा, जाणून घ्या घरगुती ब्युटी सिक्रेट

Homemade Face Packs : सणासुदीला महागड्या ब्युटी पार्लरला जाण्यापेक्षा घरीच उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून फेस पॅक बनवून चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येईल.

Shreya Maskar

सणासुदीला प्रत्येकाला सुंदर आणि फ्रेश दिसायचे असते. त्यामुळे अनेक महिला ब्युटी पार्लरकडे धाव घेतात. अनेक पैसे देऊनही त्याच्या चेहऱ्यावर ग्लो येत नाही. शिवाय पैसेही वाया जातात. असे होऊ नये सणासुदीला तुमचेही सौंदर्य खुलून यावे. यासाठी घरगुती पदार्थांपासून तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावा. त्वचा मऊ, तजेलदार सोबतच नैसर्गिकरित्या चमकू लागेल. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स, सुरकुत्या, काळे डाग देखील दूर होतील.

टोमॅटो फेस पॅक

साहित्य

  • टोमॅटो, दही, मध

कृती

टोमॅटो फेस पॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये टोमॅटो प्युरी, दही आणि मध मिक्स करून घ्या. ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यानंतर टोमॅटोच्या एका स्लाईसने चेहऱ्यावर स्क्रब करा. या पेस्टमुळे चेहऱ्याचे टॅनिंग दूर होऊन नैसर्गिक त्वचा मिळेल. टोमॅटो फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी गरम पाण्याची स्टीम घ्या त्यामुळे चेहऱ्याची त्वचा मुलायम होईल. लक्षात ठेवा चुकूनही फक्त दही चेहऱ्यावर लावू नये. यामुळे त्वचेला ॲलर्जीचा धोका वाढतो.

ओट्स फेस पॅक

साहित्य

  • ओट्स, मध, गुलाब पाणी, दूध

कृती

ओट्सचा फेस पॅक तयार करण्यासाठी ओट्स थंड पाण्यामध्ये भिजवा. जेणेकरून ते घट्ट् होतील. घट्ट् झालेले ओट्सचा एका बाऊलमध्ये काढा आणि त्यात मध, गुलाब पाणी आणि दूध मिक्स करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून त्यावर बर्फ चोळा. यामुळे त्वचा तजेलदार होते. ओट्स फेस पॅक पिंपल्स दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसेच चेहऱ्याच्या सुरकुत्या दूर करून नैसर्गिक ग्लो येतो.

कॉफी फेस पॅक

साहित्य

  • कॉफी पावडर, कच्चे दूध, मध

कृती

कॉफीचा फेस पॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मध, कच्चे दूध आणि कॉफी पावडर टाकून मिक्स करून घ्यावे. हा फेस पॅक चेहऱ्याला लावून छान मसाज करावा. यामुळे त्वचेवरील घाण निघून जाऊन, त्वचा तेजस्वी होते. कॉफीमुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होऊन इन्स्टंट ग्लो येतो. मध त्वचेला पोषण देऊन त्वचेची पोत सुधारते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT