आजकाल दात पिवळे होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. चहा, कॉफी, जास्त तंबाखूचे सेवन किंवा दातांची अयोग्य स्वच्छता. या कारणांमुळे दात अधिक खराब होतात. अनेकदा नियमित दात घासूनही दातांचा पिवळेपणा जात नसेल तर, काही घरगुती टिप्स फॉलो करून आपण दातांवरचा पिवळ थर काढू शकता. यासाठी आपल्याला टुथपेस्टची गरज नाही. घरगुती वस्तूंचा वापर करून आपण टूथ पावडर तयार करू शकता.
हेल्थ कोच शिवांगी देसाई यांनी तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने एका खास पावडरचे वर्णन केले आहे. या पावडरने ब्रश केल्याने फक्त १५ दिवसांत दातांचा पिवळेपणा दूर होऊ शकतो. व्हिडिओमध्ये शिवांगी देसाई यांनी स्पष्ट केले की, 'जर तुमचे दात पिवळे असतील, तोंडातून दुर्गेंधी येत असेल किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल तर हा उपाय करून पहा'.
टूथ पावडर तयार करण्याची पद्धत
सर्वात आधी तुरटीची पावडर तयार करा. एका वाटीत तुरटीची पावडर घ्या. त्यात दुप्पट प्रमाणात सोडा मिसळा. पॅन गॅसवर ठेवा. पॅनवर ही पावडर घालून भाजून घ्या. गॅस बंद करा. थंड झाल्यावर घट्ट होईल. आता हे गोठलेले मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक पावडर तयार करा. शेवटी त्यात हळद घालून मिसळा.
या टूथ पावडरचा वापर करून नियमित दात घासा. दोन आठवड्यात दात चमकदार दिसतील. तसेच तोंडाची दुर्गंधीही दूर होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.