Tasty Momos saam tv
लाईफस्टाईल

Tasty Momos: बाहेर मोमोज खाऊन कंटाळलात? आता घरच्या घरी तयार करा हेल्दी मोमोज, एकदम सोप्पी रेसिपी

Healthy Momos: चमचमीत खावसं वाटतय? पण पौष्टीक असायला हवं? तर घरीच ट्राय करा मोमोज रेसिपी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. मग आपल्या खाण्यापिण्यात आपण बदल करतो. तेव्हा आपण घरगुती पौष्टिक पदार्थ जेवणात वापरतो. पण रोज त्याच भाज्या, कडधान्ये, पोळी , वरण भात हे घरगुती जेवण खाल्ल्याने सर्वांना कंटाळा येतो.

त्यामुळे लहान मुलं सुद्धा जेवणाला नकार देतात. आता यावर उपाय म्हणून तुम्ही घरगुती पद्धतीने पौष्टीक भाज्यांचा वापर करुन टेस्टी मोमोज तयार करू शकता. चला तर जाणून घेऊयात सोप्पी घरगूती मोमोज रेसिपी.

साहित्य कोण कोणतं घ्याल ?

एक वाटी मैदा

अर्धी वाटी बारीक किसलेली कोबी

अर्धी वाटी बारीक किसलेले गाजर

अर्धी वाटी बारीक किसलेली शिमला मिर्ची

अर्धी वाटी बारीक किसलेले बीट

१ चमचा काळी मिरी पावडर

२ चमचे अदरक लसून पेस्ट

चवीनुसार तेल आणि मिठ.

हेल्दी मोमोज करण्यासाठी कृती काय?

प्रथम एका भांड्यात मैदा, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालून कणिक मळून घ्या. त्याला १० मिनिट कपड्यात मऊ होण्यासाठी ठेवा. आता गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला.

त्यानंतर त्यात आलं लसून पेस्ट, सगळ्या भाज्या आणि काळीमिरी पावडर घाला. त्यानंतर हे मिश्रण एकत्र करा. पुढे त्यावर झाकन ठेवून स्लो गॅसवर शिजवून घ्या. त्यानंतर १० मिनिटांनी गॅस बंद करा. आता हे मिश्रण थोड्यावेळासाठी थंड करायला ठेवा.

आता कणिक घ्या. त्याचा लहान गोळा घेवून पुरी सारखा लाटा. मग त्यामध्ये सारणासारखं तयार भाज्यांचे मिश्रण घाला. आता ते मोदकासारख्या पाकळ्या करत वळून घ्या.आता ईडली स्टॅंड घ्या किंवा पातेलही चालेल. त्यामध्ये तयार मोमोज १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या. यानंतर चिमट्याच्या साहाय्याने मोमोज एका प्लेट मध्ये काढून घ्या. आता मेयोनीझसोबत हे हेल्दी मोमोज सर्व करु शकता.

Edited By: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT