cholesterol symptoms google
लाईफस्टाईल

High Cholesterol: वजन वाढल्यामुळे वाढू शकतो कोलेस्टेरॉल अन् हार्ट अटॅकचा धोका, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Heart Health: वजन वाढ, चुकीचा आहार आणि ताण यामुळे कोलेस्टेरॉल वाढते. सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत. योग्य आहार, व्यायाम आणि सवयी बदलून हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका कमी करता येतो.

Sakshi Sunil Jadhav

कोलेस्टेरॉलची सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत

जंक फूड, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान टाळा

व्यायामामुळे HDL (चांगले कोलेस्टेरॉल) वाढतं

तुम्हाला प्रत्येकाच्या घरात अशी एक व्यक्ती पाहायला मिळत असेल जी खूप आळशी किंवा लठ्ठ झाली असेल. सगळे लोक येता जाता त्याव्यक्तीला टोमणे मारत असतात. पण ही एक समस्या आहे. जी बरेच लोक नेहमीच म्हणून दुर्लक्षित करतात.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, कामाच्या टेन्शनमुळे आणि बाहेरच्या खाण्यामुळे उच्च कोलेस्टेरॉलची ( High Cholesterol)समस्या वाढते. याची लक्षणं एकतर सुरुवातीला जाणवत नाहीत आणि ती खूप सामान्य असतात. जर तुम्ही यावर वेळीच उपचार केले नाही, तर तुम्हाला हार्ट अटॅक, स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.

वाढलेल्या कोलेस्टेरॉलची कारणे

कोलेस्टेरॉल हा तुमच्या बाहेरच्या खाण्यामुळे सगळ्यात जास्त प्रमाणात वाढतो. तुम्ही व्यायाम करत नसाल तर वाढतो, तुमचा फॅट, वजन वाढलं असेल तर वाढतो, तुम्हाला धूम्रपान किंवा मद्यपानाच्या सवयी असतील तर वाढतो आणि तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं जास्त टेन्शन असेल तर वाढू शकतो.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सोपे उपाय

१. योग्य आहार घ्या

तुमच्या आहारात होल ग्रेन्स, फळं, भाज्या आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा. सकाळची सुरुवात ओट्स, केळी आणि फ्लॅक्ससीड्सने करा.

२. वजन नियंत्रणात ठेवा

जास्त वजनामुळे LDL वाढतो. म्हणूनच पोट भर घा. पण त्यात अंतर ठेवा. रोजच्या सवयींमध्ये लहान बदल करा. तसेच साखरयुक्त पेयांच्या ऐवजी लिंबूपाणी किंवा इन्फ्यूज्ड वॉटर घ्या.

३. नियमित व्यायाम करा

व्यायामामुळे HDL वाढतो आणि LDL कमी होतो. आठवड्यात किमान 150 मिनिटं व्यायाम करा. रोज 30 मिनिटं वेगाने चालणं हा सुद्धा एक पर्याय आहे.

४. धूम्रपान सोडा

धूम्रपानामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. सिगारेटऐवजी श्वसनाचे किंवा स्ट्रेचिंगचे छोटे ब्रेक घ्या. जास्त मद्यपानामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात. कॉकटेलऐवजी पुदिन्याचे किंवा लिंबाचे फ्लेवर्ड पाणी प्या.

टीप:

ही माहिती सामान्य आरोग्य सल्ला म्हणून दिली आहे. वैयक्तिक आजार किंवा उपचारांसाठी कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

SCROLL FOR NEXT