High Cholesterol 
लाईफस्टाईल

Cholesterol Symptoms: वाढत्या कोलेस्टेरॉलची 5 लक्षणं दिसतील नखांवर, दुर्लक्ष केल्यानं वाढेल हृदयविकाराचा धोका

High Cholesterol: वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे नखांवर दिसणारी लक्षणे दुर्लक्षित केल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या सविस्तर.

Sakshi Sunil Jadhav

सध्या थंड हवामान आपल्याला पाहायला मिळत आहे. या दिवसात हार्टच्या रुग्णांना किंवा साठी ओलांडलेल्यांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे. कारण या दिवसात कोलेस्टेरॉल वाढत असतो. त्याची लक्षणे शरीराच्या कोणत्याही भागात जाणवू शकतात. त्यामुळे हृदयासाठी हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे. पुढे आपण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हाताच्या नखांवर याची लक्षणे कशी दिसतात हे जाणून घेणार आहोत.

बऱ्याचदा नखांमध्ये जर काही बदल झाला तर आपण सौंदर्याचा प्रश्न म्हणून पाहतो, पण प्रत्यक्षात ते कोलेस्टेरॉल किंवा हृदयविकाराशी संबंधित असू शकतं. जेव्हा कोलेस्टेरॉल वाढतं तेव्हा शरीरातल्या रक्ताभिसरणावर लगेचच परिणाम होतो. रक्तप्रवाह व्यवस्थित सुरळीत झाला नसल्यामुळे तुम्हाला नखांवर काळसर रेषा, रंग बदल किंवा फिकटपणा जाणवतो. काही लोकांच्या नखांवर उभ्या रेषा दिसतात, यालाच 'ऑनिकोऱ्हेक्सिस' असं म्हणतात. हा त्रास पोषणतत्त्वांची कमतरता किंवा अ‍ॅनिमियामुळेही होतो, मात्र कोलेस्टेरॉल वाढलेले असल्यास तो जास्त ठळकपणे दिसून येतो.

काही रुग्णांमध्ये नखं वाकडी होतात आणि बोटांचा टोकाचा भाग स्पंजसारखा मऊ वाटतो ही लक्षणं दिसतात. यामागे बराचवेळ ऑक्सिजनची कमी हे एक महत्त्वाचं कारण असतं. जे वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे होतं. काहीवेळेस नखांचा रंग निळसर किंवा जांभळट होतो हेही रक्ताभिसरणात अडथळा येत असल्याचं लक्षण मानलं जातं.

हाय कोलेस्टेरॉलचा परिणाम नखांच्या मजबुतीवरही होतो. नखं ठिसूळ होतात, वारंवार तुटतात किंवा सहज निघतात, पातळ होतात हे सुद्धा याचाच भाग असू शकतात. कारण रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे नखांना पाहिजे तेवढं ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळत नाहीत. काही वेळा नखे वाढायलाही खूप वेळ लागतो. नेहमीपेक्षा नखे हळू वाढत असतील, तर तोही शरीरातील रक्तप्रवाह कमी झाल्याचा इशारा असू शकतो.

काही रुग्णांमध्ये नखं अचानक फिकट दिसतात किंवा त्यांचा नैसर्गिक गुलाबी रंग कमी होतो. हे सुद्धा वाढलेल्या कोलेस्टेरॉलशी संबंधित लक्षण मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते, नखांमध्ये असे कोणतेही बदल सतत जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC क्रीमी लेयरबाबत केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, जुन्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्हा परिषदेसमोर शिक्षक सेनेचे घंटानाद आंदोलन

Aalyache Pani: १५ दिवस आल्याचे १ ग्लास पाणी प्यायल्याने काय होते?

आणखी एका दिग्गज नेत्याची एक्झिट! भाजप आमदार,माजी मंत्र्यांचे निधन! राज्याच्या राजकारणात शोककळा

Drinking Milk At Night: रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीरात काय होतं?

SCROLL FOR NEXT