Sakshi Sunil Jadhav
मंगळसूत्र हे लग्न झालेल्या महिलांना वापरणं ही परंपरा आहे किंवा पद्धत आहे. याला सौभाग्याचं लेणं सुद्धा म्हणतात.
प्रत्येक लग्न झालेली स्त्री तिच्या नवऱ्याच्या नावाचं मंगळसुत्र गळ्यात घालते. पण सध्या जीवनशैली आणि फॅशनमुळे काही बदल झाले आहेत.
काही महिला सणावारांशिवाय मंगळसूत्र गळ्यात घालत नाहीत. त्यामध्ये कामाला किंवा कॉर्पोरेटमध्ये कामाला जाणाऱ्या महिला ते हातात घालतात.
मंगळसूत्र फॅशन म्हणून गळ्याऐवजी हातात घालणं हे कितपत योग्य आहे. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला याबद्दल जाणून घेऊ.
बऱ्याच मंगळसुत्रांमध्ये काळ्या मण्यांचा आणि सोन्याचा वापर केला जातो. मंगळसूत्रामधल्या काळ्या मण्या तुम्हाला नकारात्मक शक्तीपासून लांब ठेवतात. तसेच सोनं वापरल्याने तुमचा गुरु ग्रह शांत होतो.
मंगळसुत्रातले काळे मणी हे तुमच्या नात्यातली ताकद वाढवतात. तसेच येणाऱ्या कोणत्याही संकटांना सामना करण्याचं बळ देतात.
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळसूत्र हे पवित्र असतं. त्यामुळे याचा वापर जपून आणि व्यवस्थित करावा.
आता प्रश्न येतो की, हातात मंगळसूत्र घालण्याचा. तर हे चुकीचे नाही तर उपयुक्त ठरत नाही. कारण हातात मंगळसूत्र घातल्याने त्याची शक्ती किंवा ऊर्जा कमी होते. त्यामुळे शक्यतो ते गळ्यातच घालावं. याने नात्यावर परिणाम होत नाही.