Sakshi Sunil Jadhav
थंड हवामान, हिरवागार निसर्ग आणि मुंबई–पुण्याजवळचा लोणावळा हे न्यू ईअर साजरे करण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे.
पिकनिक आणि फॅमिली ट्रिपसाठी प्रसिद्ध असलेला भुशी डॅम हा लोणावळ्यापासून 6 किमीवर आहे. जो प्रत्येक न्यू इयरला गर्दीने गजबजलेला असतो.
लोणावळ्यापासून फक्त 15 किमी अंतरावर असलेला राजमाची पॉइंट गर्दीपासून लांब शांत वातावरणात आहे. सनसेट पाहण्यासाठी हे ठिकाण खास मानलं जातं.
फक्त 12 किमी अंतरावर असलेला टायगर पॉइंट थंड वाऱ्यांसह खोल दऱ्या पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांसोबत न्यू इयर ट्रिपसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
लोणावळ्यापासून 5 किमी अंतरावर असलेला कुणे फॉल्स हा महाराष्ट्रातल्या उंच धबधब्यांपैकी एक आहे. शांत पिकनिकसाठी हा हिडन स्पॉट मानला जातो.
फक्त 10 ते 15 किमी अंतरावर असलेल्या या बौद्ध लेणी इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी आकर्षण ठरतात. तुम्ही न्यू ईअयची सुरुवात इथून करू शकता.
लोणावळ्यापासून जवळपास 18 ते 20 किमी अंतरावर असलेला पावना लेक न्यू इयर कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. बोनफायर आणि मित्रांसोबत डान्स पार्टी करण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
एंबी व्हॅली परिसरातल्या छोट्या टेकड्या, रस्ते आणि व्ह्यू पॉइंट्स शांत ड्राइव्हसाठी उत्तम पर्याय आहेत.