High Blood Pressure Saam Tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure असणाऱ्यांसाठी हिवाळा अधिक घातक! वाढू शकतो अनेक आजारांचा धोका

Winter Care Tips : हिवाळ्यात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या ऋतूमध्ये वातावरणातील बदलामुळे रक्तवाहिन्यावर परिणाम होतो. शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे हृदयावरील कामाचा ताण वाढतो.

कोमल दामुद्रे

Hypertension :

हिवाळा सुरु झाला की, अनेक आजार डोकं वर काढतात. या काळात वातावरणात अनेक बदल होतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. या ऋतूमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांना स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते.

या काळात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या ऋतूमध्ये वातावरणातील बदलामुळे रक्तवाहिन्यावर परिणाम होतो. शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे हृदयावरील कामाचा ताण वाढतो. इतकेच नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. हिवाळ्यात कोणत्या आजारांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया

1. स्ट्रोक

हिवाळ्यात (Winter Season) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा रक्तदाब वाढतो. ज्याचा थेट परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. जास्त रक्तदाबामुळे स्ट्रोकचा झटका येऊ शकतो. यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना या वेळी तणाव आणि बीपी नियंत्रणात ठेवावे लागते.

2. पेरिफेरल आर्टरी डिजीज

पेरिफेरल आर्टरी डिजीज झाल्यावर रक्त परिसंचरण मंदावते. ज्यामुळे शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो. हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे. हिवाळ्यात हाय बीपीच्या (Blood Pressure) रुग्णांमध्ये अधिक त्रास होण्याची भीती असते.

3. डोळ्यांशी संबंधित त्रास

उच्च रक्तदाब आणि तणावामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. ज्यामुळे डोळे खराब होतात. तसेच ऑप्टिक नर्व्हमध्ये सूज देखील येऊ शकते. ज्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घ्यायला हवी.

4. हृदयविकाराचा झटका

हिवाळ्यात कोलेस्टेरॉल धमन्यांवर परिणाम होतो ज्यामुळे रक्तवाहिन्या आकसतात. ज्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो. अशावेळी आपल्या हृदयाला रक्त पुरवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suruchi Beach Vasai : मुंबई जवळ वसलेला आहे 'हा' शांत समुद्रकिनारा, फॅमिली फ्रेंड्ससोबत वीकेंडला नक्कीच भेट द्या

PM Awas Yojana: घरकूल लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी, सौर संच बसवायला मिळणार 'CSR' फंड; बँकेतूनही घेता येणार कर्ज, वाचा

Fruits For Eye And Skin: कमी होईल चष्म्याचा नंबर आणि चेहऱ्यावर येईल ग्लो; दररोज 'या' 3 फळांचे करा सेवन

Kalyan Crime : लग्नाचं वचन देऊन लाखो रुपये उकळले, शरीर संबंध ठेवत मारहाण केली; नैराश्येत गेलेल्या एअर होस्टेसने जीवन संपवलं

Maharashtra Live News Update : मकरसंक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची तुळशी व पाद्यपुजा बंद राहणार

SCROLL FOR NEXT