High blood pressure Saam Tv
लाईफस्टाईल

High blood pressure : उच्च रक्तदाबासाठी हा योग ठरेल रामबाण, नैसर्गिकरित्या राहिल उच्च रक्तदाब नियंत्रणात

उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवण्यासाठी ही योगासने करा

कोमल दामुद्रे

High Blood Pressure : उच्च रक्तदाबाच्या समस्येला आजकाल बहुतेकांना सामोरे जावे लागते. रक्त उच्च रक्त दाबाच्या रक्तवाहिन्यांवर आदळते त्याला उच्च रक्तदाब तयार होतो.

हे देखील पहा -

उच्च रक्तदाबामुळे संपूर्ण शरीरात रक्त (Blood) वाहून नेण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. दीर्घकालीन उच्च रक्तदाबामुळे हृदय अपयश आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका वाढू शकतो. या समस्येवर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण योगासनांची मदत घेऊ शकतो. योग हा केवळ नियंत्रण ठेवत नाही तर आपल्या शरीरात तयार होणारा उच्च रक्तदाब कमी करण्याचा नैसर्गिक मार्ग शोधतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि किडनीशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. हे बर्‍याचदा अत्याधिक तणाव आणि चिंतामुळे होते.

उच्च रक्तदाबाचे कारण काय ?

१. तणाव हा महत्त्वाचा घटक असल्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. आपण तणावाखाली असल्यास आपल्या हृदयाचे धोके अधिक जलद गतीने चालतात आणि त्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात.

२. धूम्रपान, मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन यासह प्रतिकूल जीवनशैली निवडीमुळे देखील हानी होते.

३. आपण पुरेसा व्यायाम करत नसाल किंवा आपले वजन वाढत असेल तर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

ही योगासने करा -

१. हे आसन उत्तासनात किंवा पुढे झुकण्याच्या योगात केल्याने आपली मज्जासंस्था शांत आणि निरोगी राहण्यास मदत होते. हे आसन गुडघ्याच्या मागच्या नसा आणि पोटाच्या स्नायूंना ताणते.

२. विपरिता करणी योगात शरीराला शांत ठेवण्यास मदत करते. विपरिता करणी योगामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो. या योगासनामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि तरुण दिसण्यास मदत करते.

३. पश्चिमोत्तासन हे तणाव दूर करण्यासाठी सर्वोत्तम योग (Yoga) आसनांपैकी एक आहे. चिंता, नैराश्य, चिडचिडेपणा कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

४. डाउनवर्ड-फेसिंग डॉग पोझ किंवा अधो मुख स्वानासन हे अत्यंत लोकप्रिय योग आसनांपैकी एक आहे. हे सर्वात उत्साही योगासन आहे. हे योगासन करताना शरीर सैल आणि मन शांत ठेवून हे आसन करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या दाजींना टॉर्चर...;मेहुण्याचा खळबळजनक खुलासा, बीडच्या माजी उपसरपंच मृत्यूप्रकरणात ट्विस्ट

Maharashtra Live News Update: लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा लिलाव सुरू

C. P. Radhakrishnan यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा, बनले भारताचे नवे उपराष्ट्रपती

Dead Snake In Ration Rice: बापरे! रेशनच्या तांदळात आढळला मेलेला साप; चार दिवस खाल्ल्यानंतर...; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या अक्षेपार्ह फोटो प्रकरणी हायकोर्टाची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT