Parenting Tips  saam tv
लाईफस्टाईल

Importance Of Sleep : मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी पुरेशी झोप का महत्वाची? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Parenting Tips : मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी योग्य वेळी आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते झोपेमुळे स्मरणशक्ती, एकाग्रता व मानसिक आरोग्य सुधारते.

Sakshi Sunil Jadhav

मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी आणि त्यांच्या निरोगी जीवनशैलीसाठी झोप महत्वाची मानली जाते. झोपेने फक्त कमी होतो. असा अनेकांचा समज आहे. मात्र पुरेशी झोप मिळाल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता वाढायला सुरुवात होते. तज्ज्ञांच्या मते, जर मुलांनी रात्री पुरेशी झोप घेतली तर त्यांचा मेंदू अॅक्टीव्ह राहतो आणि त्यांचे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुधारते.

तज्ज्ञ सांगतात की मुलांनी रात्री ९ वाजेपर्यंत झोपणं फायदेशीर असतं. तर सकाळी ७ वाजता उठायची सवय सगळ्यांना असली पाहिजे. या वेळेत झोप घेतल्याने शरीरात नैसर्गिक झोपेचे हार्मोन्स सक्रिय होतात. जे झोपेची गुणवत्ता सुधारतात. पूर्ण झोप झाल्यावर दिवसभर शिकलेल्या गोष्टी मेंदूत योग्य प्रकारे साठवल्या जातात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढते.

जर मूल रात्री उशिरा झोपले तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. १० वाजता झोपल्यास मेंदूला चालना देणारा ग्रोथ हार्मोन कमी प्रमाणात तयार होतो. ज्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. जर मूल रात्री ११ वाजता झोपले तर झोपेच्या वेळी मेंदूची स्वतःला स्वच्छ करण्याची प्रक्रिया बिघडते. परिणामी, मेंदू गोंधळलेला राहतो आणि मुलाचे लक्ष विचलित होते.

सर्वात हानिकारक स्थिती म्हणजे मूल मध्यरात्री १२ वाजता झोपणे. या वेळेला झोपल्याने मुलाला पुरेशी झोप मिळत नाही. त्याचा थेट परिणाम त्यांच्या मूडवर, अभ्यासावर आणि एकाग्रतेवर होतो. यामुळे लहान वयातच मूड स्विंग्स वाढतात आणि पौगंडावस्थेचे दुष्परिणाम दिसू लागतात. हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घातक ठरते. योग्य वेळी झोप घेणे हे मुलांच्या निरोगी भविष्याचे आणि तीक्ष्ण बुद्धीचे रहस्य आहे, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? तर आत्ताच व्हा सावध! शरीरावर होऊ शकतात ५ गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

आमदार विकून मुख्यमंत्रिपद दिलं अन् त्याला लोकशाही म्हणता?; कपिल सिब्बल भडकले,आयोगाची कोंडी, युक्तिवादाचा शब्द ना शब्द

SCROLL FOR NEXT