Heart Attack  Yandex
लाईफस्टाईल

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Heart Attack free Medicine : जागतिक हृदय दिनाच्या पूर्वसंध्येला आरोग्य विभागानं नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. हार्ट अटॅकचे उपचार आता सरकारी रुग्णालयात देखील मिळणार आहेत. हृद्यविकाराचं प्रमाण वाढलं आहे. उपचारांचा खर्चही वाढला आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारचा निर्णय सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा आहे. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

मुंबई : गोल्डन अवरमध्ये हृदयविकाराचा झटका शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कार्यक्रम सुरू केल्यानंतर आरोग्य विभागानं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना मोफत क्लॉट बस्टिंग औषध म्हणजेच रक्ताची गुठळी विरघळणारे औषध उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पहिली पायरी म्हणून, महाराष्ट्र सरकारने क्लॉट-बस्टिंग औषध-टेनेक्टेप्लेस-चा समावेश अत्यावश्यक औषधांच्या यादीत केला आहे. ज्यामुळे त्याची किंमत कमी होईल, असे राज्य आरोग्य विभागाने म्हटले आहे. मुंबईतील खासगी रुग्णालये या औषधासाठी सुमारे ५० हजार रुपये आणि इंजेक्शनचे शुल्क आकारतात.

पुढील दोन महिन्यांत, राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिचारिकांना टेनेक्टप्लेसची गरज असलेल्या रुग्णांना कसे ओळखावे आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जे रुग्णवाहिकेत देखील दिले जाऊ शकते. जिल्हा रुग्णालयांमध्ये 23 कार्डियाक कॅथ लॅबच्या निर्मितीलाही मान्यता दिली आहे. जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयासह सर्व सरकारी रुग्णालयात हृदयविकारावर उपचार मिळणार आहेत.

अनेक नागरिकांनी हार्ट अटॅकचा धसका घेतला आहे. तरुणपणातही हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. व्यायाम करताना, गाडी चालवताना, अगदी स्वस्थ बसलेले असताना अनेकांना हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. मात्र आता सरकारी रुग्णालयात उपचार होणार असल्यानं उपाचाराची धावाधाव कमी होऊन रुग्णाचे प्राण वाचणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT