Sings Of Heart Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Sings Of Heart Problem : व्यायाम केल्यानंतर शरीरात ही लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध! येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

Warning Sings of Heart Problem During exercise : हृदयविकार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेह टाळण्यासाठी व्यायाम करणे अंत्यत आवश्यक आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, आठवड्यातून किमान ३ ते ५ दिवस ३० मिनिटांचा व्यायाम आरोग्यासाठी चांगला असतो.

कोमल दामुद्रे

Heart Attack Symptoms :

आपल्यापैकी अनेकजण सकाळी नियमितपणे व्यायाम करतात. व्यायाम हा आरोग्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. दिवसभर बसून काम केल्याने आपल्याला आरोग्यावर परिणाम होतो.

हृदयविकार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेह (Diabetes) टाळण्यासाठी व्यायाम करणे अंत्यत आवश्यक आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, आठवड्यातून किमान ३ ते ५ दिवस ३० मिनिटांचा व्यायाम आरोग्यासाठी (Health) चांगला असतो. परंतु जर तुम्ही अतिप्रमाणात व्यायाम करत असाल तर हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. व्यायाम केल्यानंतर शरीरात ही लक्षणे (Symptoms) दिसत असतील तर वेळीच काळजी घ्या.

1. व्यायाम केल्यानंतर हृदयाची तपासणी

जेव्हा आपण व्यायाम करतो त्यानंतर हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. व्यायामादरम्यान काही लक्षणे दिसल्यास हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.

2. छातीत दुखणे

छातीत दुखणे, डाव्या हाताला दुखणे आणि जबड्यात दुखणे ही सायलेंट हार्ट अॅटॅकची लक्षणे आहेत. कधीकधी शारीरिक व्यायाम किंवा मानसिक तणावामुळेही छातीत दुखू लागते. जे सायलेंट हार्ट अॅटॅकचे लक्षण असू शकते.

3. श्वास घेताना त्रास

अधिक व्यायाम केल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. कधीकधी छातीत दुखणे देखील श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेण्यास त्रास होणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे (Heart Attack) लक्षण नसले तरी मंद हृदयाचे लक्षण असू शकते.

4. थकवा जाणवणे

अतिव्यायाम केल्याने थकवा जाणवणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, व्यायाम केल्यानंतर चक्कर येत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. यासाठी लगेच हेल्थ चेकअप करा.

5. हृदयाच्या ठोक्यांची गती

व्यायाम करताना हृदयाचे ठोके वाढले आणि जलद होत असतील तर ते हृदयविकाराच्या समस्येशी संबंधित लक्षण आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

6. शरीराच्या इतर भागात संवेदना

छातीशिवाय शरीराच्या इतर भागात संवेदना होतात. हात, मान, जबडा, पाठ किंवा पोटात दाब येणे यांसारख्या समस्या येतात. तसेच सतत अस्वस्थ वाटू लागते. शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात वेदना पसरत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT